S M L

बेळगाव महापालिका बरखास्त निर्णयाला स्थगिती

19 जूनबेळगाव महानगरपालिकेला कोर्टाकडून दिलासा मिळालाय. 15 डिसेंबर 2011 ला कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा आदेश दिला होता. त्याला कर्नाटक उच्च न्यायलयाने आता रद्दबातल ठरवलंय. बेळगाव महानगपालिकेतील सर्व 57 नगरसेवकांना 25 जूनला बेळगाव महापालिका सभागृहात बाजू मांडायची संधी द्या आणि मग निर्णय घ्या असे आदेश हाय कोर्टाने दिले आहे. कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केल्यानंतर नगरसेवक संजय प्रभू आणि दिपक वाघेला यांनी उच्च न्यायलयात कर्नाटक सरकारविरोधात याचिका दाखल केली होती.1 नोव्हेंबर 2011 रोजी बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत भाग घेतला होता. त्यावर चिडलेल्या कर्नाटक सरकारने महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यात 20 प्रश्नांवर स्पष्टीकरण मागितलं होतं. पण, त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केली. बेळगाव महापालिकेचा कारभार आता प्रशासकाच्या हातीयेण्यापूर्वी 2005 मध्ये बेळगाव महापालिकेत मराठी महापौर आणि उपमहापौर असताना तत्कालीन धरमसिंह सरकारने अशा प्रकारची कारवाई केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2012 09:47 AM IST

बेळगाव महापालिका बरखास्त निर्णयाला स्थगिती

19 जून

बेळगाव महानगरपालिकेला कोर्टाकडून दिलासा मिळालाय. 15 डिसेंबर 2011 ला कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा आदेश दिला होता. त्याला कर्नाटक उच्च न्यायलयाने आता रद्दबातल ठरवलंय. बेळगाव महानगपालिकेतील सर्व 57 नगरसेवकांना 25 जूनला बेळगाव महापालिका सभागृहात बाजू मांडायची संधी द्या आणि मग निर्णय घ्या असे आदेश हाय कोर्टाने दिले आहे. कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केल्यानंतर नगरसेवक संजय प्रभू आणि दिपक वाघेला यांनी उच्च न्यायलयात कर्नाटक सरकारविरोधात याचिका दाखल केली होती.

1 नोव्हेंबर 2011 रोजी बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत भाग घेतला होता. त्यावर चिडलेल्या कर्नाटक सरकारने महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेकर यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यात 20 प्रश्नांवर स्पष्टीकरण मागितलं होतं. पण, त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केली. बेळगाव महापालिकेचा कारभार आता प्रशासकाच्या हातीयेण्यापूर्वी 2005 मध्ये बेळगाव महापालिकेत मराठी महापौर आणि उपमहापौर असताना तत्कालीन धरमसिंह सरकारने अशा प्रकारची कारवाई केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2012 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close