S M L

ऑलिम्पिकसाठी टेनिसच्या दोन टीम पाठवणार ?

20 जूनभारतीय टेनिसमधील वाद हा अजूनही कायम आहे. ऑलिम्पिक प्रवेशासाठी टीम जाहीर करण्याची तारीख उद्यावर आली आहे तरीही दुहेरीत पेससोबत कोण खेळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तर भारतीय टेनिस असोसिएशन आता ऑलिम्पिकसाठी दोन टीम पाठवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पहिल्या टीममध्ये पेसबरोबर विश्णू बर्धन खेळेल तर भूपती आणि बोपण्णा यांची दुसरी टीम ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जातेय. पण लिएंडर पेसला हा 2 टीम पाठवण्याचा प्रस्ताव मान्य नाही. पेस हा भारताचा टॉप रँकिंगचा खेळाडू आहे आणि त्यामुळे नवख्या खेळाडूबरोबर खेळण्यास पेसचा नकार दिला आहे. आणि जर कमी रँकिंगच्या खेळाडूबरोबर आपली टीम बनवली तर आपण ऑलिम्पिक खेळणार नाही असा इशाराही पेसनं दिला. त्यामुळे आता सर्व प्रकरणी भारतीय टेनिस असोसिएशन काय नेमका निर्णय घेतयं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलयं. उद्या दुपारपर्यंत टेनिस असोसिएशन टीम जाहीर करणार आहे. ऑलिम्पिक समितीलाही नाव देण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. लिअँडरनं आपल्या पत्रात काय म्हटलंय. 'जर असं असेल तर भारतीय टेनिसच्या भल्यासाठी मला ऑलिम्पिकमधून माघार घेण्याशिवाय पर्याय नाही. महेश आणि रोहननं बसवलेल्या नाट्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही किंवा त्यांचं कौतुक करू शकत नाही. देशातल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या खेळाडूंसाठी (विशेषतः टेनिसपटूंसाठी) हे दुदैर्वी उदाहरण आहे.'

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2012 11:43 AM IST

ऑलिम्पिकसाठी टेनिसच्या दोन टीम पाठवणार ?

20 जून

भारतीय टेनिसमधील वाद हा अजूनही कायम आहे. ऑलिम्पिक प्रवेशासाठी टीम जाहीर करण्याची तारीख उद्यावर आली आहे तरीही दुहेरीत पेससोबत कोण खेळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तर भारतीय टेनिस असोसिएशन आता ऑलिम्पिकसाठी दोन टीम पाठवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पहिल्या टीममध्ये पेसबरोबर विश्णू बर्धन खेळेल तर भूपती आणि बोपण्णा यांची दुसरी टीम ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जातेय.

पण लिएंडर पेसला हा 2 टीम पाठवण्याचा प्रस्ताव मान्य नाही. पेस हा भारताचा टॉप रँकिंगचा खेळाडू आहे आणि त्यामुळे नवख्या खेळाडूबरोबर खेळण्यास पेसचा नकार दिला आहे. आणि जर कमी रँकिंगच्या खेळाडूबरोबर आपली टीम बनवली तर आपण ऑलिम्पिक खेळणार नाही असा इशाराही पेसनं दिला. त्यामुळे आता सर्व प्रकरणी भारतीय टेनिस असोसिएशन काय नेमका निर्णय घेतयं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलयं. उद्या दुपारपर्यंत टेनिस असोसिएशन टीम जाहीर करणार आहे. ऑलिम्पिक समितीलाही नाव देण्याची उद्याची शेवटची तारीख आहे.

लिअँडरनं आपल्या पत्रात काय म्हटलंय.

'जर असं असेल तर भारतीय टेनिसच्या भल्यासाठी मला ऑलिम्पिकमधून माघार घेण्याशिवाय पर्याय नाही. महेश आणि रोहननं बसवलेल्या नाट्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही किंवा त्यांचं कौतुक करू शकत नाही. देशातल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या खेळाडूंसाठी (विशेषतः टेनिसपटूंसाठी) हे दुदैर्वी उदाहरण आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2012 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close