S M L

संस्थासम्राटांनी लाटली कोट्यावधींची शिष्यवृत्ती

20 जूनविद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडूनं नियमित शिष्यवृत्ती दिली जाते. आणि याच सवलतीचा फायदा घेऊन राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थाचालकांनी आपलं उखळ पांढरं केलंय. विशेषत: एमएसबीटीई (MSBTE) अंतर्गत येणार्‍या 61 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची खोटी आणि अवास्तव विद्यार्थीसंख्या दाखवून हा धंदा राजरोस सुरू आहे. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक फी लाटण्यासाठी खोटी विद्यार्थीसंख्या दाखवणं, स्टडी टूर, निर्वाह भत्ता, अपात्र अभ्याक्रमांसाठीही अनुदान मिळवणं, एकच देयक पुन्हा सादर करून त्यावरही पुन्हा अनुदान मिळवणं असेही धक्कादायक प्रकार अनेक शैक्षणिक संस्थांनी केल्याचं आढळून आलं आहे.समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि संस्थाचालक संगनमत करून सरकारच्याच कोट्यवधी रुपयांचा राजरोस अपहार करत आहेत. या सर्व या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने सादर केलेल्या गोपनीय अहवालात अनेक सरकारी अधिकारी आणि संस्थाचालकांच्या या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आला होता. जवळपास 47 कोटींची रिकव्हरी वसूल करून अधिकार्‍यांविरुध्द कडक कारवाईही सरकारला सूचवली होती. पण गेल्या वर्षभरापासून सरकराने हा अहवाल दडपून ठेवला. हा अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागलाय. एकाच विद्यार्थ्याचा प्रवेश अनेक अभ्यासक्रमांसाठी दाखवून संस्थाचालक हे शिष्यवृत्ती लाटण्याचा धंदा करीत असल्याचं या अहवालातून उघड झालंय. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक फी लाटण्यासाठी खोटी विद्यार्थीसंख्या दाखवणं, स्टडी टूर, निर्वाह भत्ता, अपात्र अभ्याक्रमांसाठीही अनुदान मिळवणं, एकच देयक पुन्हा सादर करून त्यावरही पुन्हा अनुदान मिळवणं असेही धक्कादायक प्रकार अनेक शैक्षणिक संस्थांनी केल्याचं आढळून आलं आहे.तांत्रिक अभ्यासक्रम शिष्यवृत्ती घोटाळा - राज्यातल्या 490 संस्थामध्ये 300 ते 400 कोटींचा घोटाळा- 2001 पासून होतोय घोटाळा- वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 119 संस्था दोषी- 14 ऑक्टो. 2010 ला चौकशी समिती स्थापन- 14 मे 11 ला समितीचा अहवाल सरकारला सादर- फेब्रुवारीत अपहार झाल्याची सरकारकडून विधिमंडळात कबुली- पण कोणतीही कारवाई नाही- अहवाल दाबून ठेवल्याचा विरोधकांचा आरोपवर्धा जिल्हा या घोटाळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे.यांनी केला घोटाळा- पंकज भोयरआर. जी. भोयर टेक्निकल एज्युकेशन- राजेंद्र शर्माचिंतामणी ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेटं अँड सायन्स - सचिन अग्निहोत्रीजय महाकाली शिक्षण संस्था - संदीप देशमुखसुरेश देशमुख कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज - प्रदीप तलमलेतुकाराम तलमले कॉलेज ऑफ टेक्नालॉजी - बलराज लोहवेरामभाऊ पडांगळे सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज- दिनेश सवाईचेतना विकास शिक्षण संस्था

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2012 04:38 PM IST

संस्थासम्राटांनी लाटली कोट्यावधींची शिष्यवृत्ती

20 जून

विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडूनं नियमित शिष्यवृत्ती दिली जाते. आणि याच सवलतीचा फायदा घेऊन राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थाचालकांनी आपलं उखळ पांढरं केलंय. विशेषत: एमएसबीटीई (MSBTE) अंतर्गत येणार्‍या 61 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची खोटी आणि अवास्तव विद्यार्थीसंख्या दाखवून हा धंदा राजरोस सुरू आहे. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक फी लाटण्यासाठी खोटी विद्यार्थीसंख्या दाखवणं, स्टडी टूर, निर्वाह भत्ता, अपात्र अभ्याक्रमांसाठीही अनुदान मिळवणं, एकच देयक पुन्हा सादर करून त्यावरही पुन्हा अनुदान मिळवणं असेही धक्कादायक प्रकार अनेक शैक्षणिक संस्थांनी केल्याचं आढळून आलं आहे.

समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि संस्थाचालक संगनमत करून सरकारच्याच कोट्यवधी रुपयांचा राजरोस अपहार करत आहेत. या सर्व या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने सादर केलेल्या गोपनीय अहवालात अनेक सरकारी अधिकारी आणि संस्थाचालकांच्या या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आला होता. जवळपास 47 कोटींची रिकव्हरी वसूल करून अधिकार्‍यांविरुध्द कडक कारवाईही सरकारला सूचवली होती. पण गेल्या वर्षभरापासून सरकराने हा अहवाल दडपून ठेवला. हा अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागलाय. एकाच विद्यार्थ्याचा प्रवेश अनेक अभ्यासक्रमांसाठी दाखवून संस्थाचालक हे शिष्यवृत्ती लाटण्याचा धंदा करीत असल्याचं या अहवालातून उघड झालंय. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक फी लाटण्यासाठी खोटी विद्यार्थीसंख्या दाखवणं, स्टडी टूर, निर्वाह भत्ता, अपात्र अभ्याक्रमांसाठीही अनुदान मिळवणं, एकच देयक पुन्हा सादर करून त्यावरही पुन्हा अनुदान मिळवणं असेही धक्कादायक प्रकार अनेक शैक्षणिक संस्थांनी केल्याचं आढळून आलं आहे.

तांत्रिक अभ्यासक्रम शिष्यवृत्ती घोटाळा - राज्यातल्या 490 संस्थामध्ये 300 ते 400 कोटींचा घोटाळा- 2001 पासून होतोय घोटाळा- वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 119 संस्था दोषी- 14 ऑक्टो. 2010 ला चौकशी समिती स्थापन- 14 मे 11 ला समितीचा अहवाल सरकारला सादर- फेब्रुवारीत अपहार झाल्याची सरकारकडून विधिमंडळात कबुली- पण कोणतीही कारवाई नाही- अहवाल दाबून ठेवल्याचा विरोधकांचा आरोप

वर्धा जिल्हा या घोटाळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

यांनी केला घोटाळा

- पंकज भोयरआर. जी. भोयर टेक्निकल एज्युकेशन- राजेंद्र शर्माचिंतामणी ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेटं अँड सायन्स - सचिन अग्निहोत्रीजय महाकाली शिक्षण संस्था - संदीप देशमुखसुरेश देशमुख कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज - प्रदीप तलमलेतुकाराम तलमले कॉलेज ऑफ टेक्नालॉजी - बलराज लोहवेरामभाऊ पडांगळे सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज- दिनेश सवाईचेतना विकास शिक्षण संस्था

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2012 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close