S M L

जुहू रेव्ह पार्टी प्रकरणी 44 जण दोषी

22 जूनमुंबई उपनगरातील जुहू येथील ओकवूडस् हॉटेलमध्ये झालेल्या रेव्हा पार्टी प्रकरणी 44 जण दोषी आढळले आहे. या पार्टीत वेन पार्नेल आणि राहुल शर्माही सह 19 विदेशी नागरिक सहभागी झाले होते. या पार्टीतील 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रेव्ह पार्टीमध्ये 92 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी 46 जणांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल मिळाला आहे. यातील 44 जण दोषी आढळलेत. त्यातील 26 जणांनी चरस घेतल्याचं सिध्द झालंय. अद्याप 38 महिला, 8 पुरुष आणि दोन क्रिकेटर यांचा अहवाल यायचा आहे. दोषी आढळलेल्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल असं मुंबईचे पोलीस कमिशनर अरुप पटनाईक यांनी सांगीतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2012 05:29 PM IST

जुहू रेव्ह पार्टी प्रकरणी 44 जण दोषी

22 जून

मुंबई उपनगरातील जुहू येथील ओकवूडस् हॉटेलमध्ये झालेल्या रेव्हा पार्टी प्रकरणी 44 जण दोषी आढळले आहे. या पार्टीत वेन पार्नेल आणि राहुल शर्माही सह 19 विदेशी नागरिक सहभागी झाले होते. या पार्टीतील 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रेव्ह पार्टीमध्ये 92 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी 46 जणांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल मिळाला आहे. यातील 44 जण दोषी आढळलेत. त्यातील 26 जणांनी चरस घेतल्याचं सिध्द झालंय. अद्याप 38 महिला, 8 पुरुष आणि दोन क्रिकेटर यांचा अहवाल यायचा आहे. दोषी आढळलेल्यांवर कायद्यानं कारवाई केली जाईल असं मुंबईचे पोलीस कमिशनर अरुप पटनाईक यांनी सांगीतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2012 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close