S M L

नाराज पेसची माघार ?

21 जूनऑलिम्पिकला दोन टीम पाठवण्याच्या भारतीय टेनिस संघटनेच्या निर्णयावर लिअँडर पेसनं नाराजी व्यक्त केली आहे. भूपती आणि बोपण्णाच्या धमकीपुढे संघटनेनं पत्करलेल्या शरणागतीला त्यानं आक्षेप घेतला आहे. देशातील सर्वोत्तम खेळाडू कमी रँकिंगच्या खेळाडूसोबत खेळण्यास पेसनं नकार दिला आहे. आणि दबाव कायम राहिल्यास आपण ऑलिम्पिकमधून माघार घेऊ असं पेसनं म्हटलंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान सानिया मिर्झा सोबत मिक्स डबल खेळण्याचं लेखी आश्वासन संघटनेनं द्यावं अशी मागणीही पेसनं केली. आज ऑलिम्पिकसाठी टीम जाहीर करण्याची शेवटची तारीख होती. एकीकडे भूपती आणि बोपण्णाची निवड करतानाच पेससाठी विष्णू वर्धनची निवड करण्यात आली आहे. मात्र मिक्स डबल्समध्ये पेस आणि सानिया एकत्र खेळतील असं टेनिस असोसिएशननं जाहीर केलं आहे. लिएंडर पेस हा लंडन ऑलिम्पिकमधील भारताचा फ्लॅग बेअरर होता. आणि आता त्यानंच जर माघार घेतली तर भारतीय क्रीडा क्षेत्रावरही नामुष्की ओढावेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2012 05:23 PM IST

नाराज पेसची माघार ?

21 जून

ऑलिम्पिकला दोन टीम पाठवण्याच्या भारतीय टेनिस संघटनेच्या निर्णयावर लिअँडर पेसनं नाराजी व्यक्त केली आहे. भूपती आणि बोपण्णाच्या धमकीपुढे संघटनेनं पत्करलेल्या शरणागतीला त्यानं आक्षेप घेतला आहे. देशातील सर्वोत्तम खेळाडू कमी रँकिंगच्या खेळाडूसोबत खेळण्यास पेसनं नकार दिला आहे. आणि दबाव कायम राहिल्यास आपण ऑलिम्पिकमधून माघार घेऊ असं पेसनं म्हटलंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान सानिया मिर्झा सोबत मिक्स डबल खेळण्याचं लेखी आश्वासन संघटनेनं द्यावं अशी मागणीही पेसनं केली. आज ऑलिम्पिकसाठी टीम जाहीर करण्याची शेवटची तारीख होती. एकीकडे भूपती आणि बोपण्णाची निवड करतानाच पेससाठी विष्णू वर्धनची निवड करण्यात आली आहे. मात्र मिक्स डबल्समध्ये पेस आणि सानिया एकत्र खेळतील असं टेनिस असोसिएशननं जाहीर केलं आहे. लिएंडर पेस हा लंडन ऑलिम्पिकमधील भारताचा फ्लॅग बेअरर होता. आणि आता त्यानंच जर माघार घेतली तर भारतीय क्रीडा क्षेत्रावरही नामुष्की ओढावेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2012 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close