S M L

26/11 च्या हल्ल्यात सहभागाची अबूची कबुली

26 जून26/11 हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अबू जुंदल याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचं एक पथक दिल्लीत दाखल झालंय. अबू जुंदलची कोठडी मिळावी यासाठी क्राईम ब्रँचनं तीस हजारी कोर्टात अर्ज केलाय. दिल्ली पोलिसांनी याबाबत आपली प्रतिक्रिया उद्यापर्यंत देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्यामुळे जुंदल मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात मिळणार का याचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान ,अबू जुंदालनं चौकशी दरम्यान हाफीज सईदसोबत काम केल्याची कबुली दिली आहे. तसेच मुंबई हल्ल्यादरम्यान नरीमन हाऊस इथल्या अतिरेक्यांशी फोनवरुन आपण संपर्कात होतो याचीही कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 26/11 हल्ल्यातील आरोपी अबू जुंदल हा मुळचा बीडचा..बीड आणि गेवराईमधली त्याचा दोन्ही घरांना सध्या कुलूप आहे. अबू जुंदलचं कुटुंब दोन महिन्यांपूर्वी इथं राहत होतं. पण सध्या या घरांमध्ये कोणीही राहत नाही. अबूचं मुळ नाव जबीउदद्दीन अन्सारी... बीडच्या जुना बाजार, किल्ला परिसरामध्ये हा राहत होता. 9 मे 2006 नंतर तो फरार आहे. इलेक्ट्रशियन असलेल्या अबु 10 ते 15 जणांचा ग्रुप होता. सुरुवातीला हा ग्रुप सिमीचं काम करायचा. त्यानंतर 2006 मध्ये तो थेट एटीएस आणि पोलिसांच्या रडारवर आला. 9 मे 2006 रोजी वेरुळ येथे मोठा शस्त्रसाठा त्यानी लपवून ठेवला होता. एटीएसला याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसनी पाठलाग सुरु केला तेव्हापासून तो फरार आहे. सुरुवातीला तो पाकिस्तानात राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर तो सौदी, इराणला गेल्याचीही माहिती मिळाली होती. मध्यंतरी एका लग्नासाठी तो औरंगाबादमध्येही येऊन गेल्याचं सांगण्यात येतंय. मुळात सुरुवातीला त्यच कार्यक्षेत्र हे बीड आणि औरंगाबाद होतं. त्याचा 10 ते 15 जणांचा ग्रुप काम करीत होते. त्यातील 3 जण अटकेत आहेत. 3 महिन्यापुर्वी औरंगाबादमध्ये एटीएस आणि संशयित अतिरेक्यामध्ये थरार झाला होता. त्यात पकडले गेलेले अबरार आणि अखिल खिलजी याचाही संबंध होता. सध्या जबीउददीन अन्सारी 3 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2012 09:29 AM IST

26/11 च्या हल्ल्यात सहभागाची अबूची कबुली

26 जून

26/11 हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अबू जुंदल याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचं एक पथक दिल्लीत दाखल झालंय. अबू जुंदलची कोठडी मिळावी यासाठी क्राईम ब्रँचनं तीस हजारी कोर्टात अर्ज केलाय. दिल्ली पोलिसांनी याबाबत आपली प्रतिक्रिया उद्यापर्यंत देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्यामुळे जुंदल मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात मिळणार का याचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. दरम्यान ,अबू जुंदालनं चौकशी दरम्यान हाफीज सईदसोबत काम केल्याची कबुली दिली आहे. तसेच मुंबई हल्ल्यादरम्यान नरीमन हाऊस इथल्या अतिरेक्यांशी फोनवरुन आपण संपर्कात होतो याचीही कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

26/11 हल्ल्यातील आरोपी अबू जुंदल हा मुळचा बीडचा..बीड आणि गेवराईमधली त्याचा दोन्ही घरांना सध्या कुलूप आहे. अबू जुंदलचं कुटुंब दोन महिन्यांपूर्वी इथं राहत होतं. पण सध्या या घरांमध्ये कोणीही राहत नाही. अबूचं मुळ नाव जबीउदद्दीन अन्सारी... बीडच्या जुना बाजार, किल्ला परिसरामध्ये हा राहत होता. 9 मे 2006 नंतर तो फरार आहे. इलेक्ट्रशियन असलेल्या अबु 10 ते 15 जणांचा ग्रुप होता. सुरुवातीला हा ग्रुप सिमीचं काम करायचा. त्यानंतर 2006 मध्ये तो थेट एटीएस आणि पोलिसांच्या रडारवर आला. 9 मे 2006 रोजी वेरुळ येथे मोठा शस्त्रसाठा त्यानी लपवून ठेवला होता. एटीएसला याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसनी पाठलाग सुरु केला तेव्हापासून तो फरार आहे. सुरुवातीला तो पाकिस्तानात राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर तो सौदी, इराणला गेल्याचीही माहिती मिळाली होती. मध्यंतरी एका लग्नासाठी तो औरंगाबादमध्येही येऊन गेल्याचं सांगण्यात येतंय. मुळात सुरुवातीला त्यच कार्यक्षेत्र हे बीड आणि औरंगाबाद होतं. त्याचा 10 ते 15 जणांचा ग्रुप काम करीत होते. त्यातील 3 जण अटकेत आहेत. 3 महिन्यापुर्वी औरंगाबादमध्ये एटीएस आणि संशयित अतिरेक्यामध्ये थरार झाला होता. त्यात पकडले गेलेले अबरार आणि अखिल खिलजी याचाही संबंध होता. सध्या जबीउददीन अन्सारी 3 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2012 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close