S M L

26/11 हल्ल्यातील अतिरेकी अबू जिंदालला अटक

25 जूनमुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका महत्त्वाच्या अतिरेक्याला अटक केलीय. अबू जिंदाल असं त्याचं नाव आहे. ही अटक खूप महत्त्वाची आहे. कारण अजमल कसाबनंतर पोलिसांच्या हाती पहिल्यांदाच लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी लागलाय. सौदी अरेबिया सरकारनं भारत सरकारच्या विनंतीवरून त्याला देशाबाहेर काढलं. आणि दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली, असं समजतंय. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी देण्यात आलीय. हल्ल्याच्यावेळी नरीमन पॉईंटमधल्या अतिरेक्यांना कराचीतल्या कंट्रोल रुममधून 5 जण सूचना देत होते, त्यापैकी अबू जिंदाल हा एक होता अशी माहिती आहे. जिंदालनं अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं तसंच त्यांना हिंदी शिकवली. 2006 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या स्फोटात आणि औरंगाबादमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्यात त्याचा हात होता. तो भारताचा नागरिक असला तरी त्याचं वास्तव्य पाकिस्तानमध्ये होतं. कोण आहे अबू हमजा ?- अबू हमजा मूळचा बीडचा- मूळ नाव जबीउद्दीन अन्सारी- बीडच्या जुन्या बाजार, किल्ला परिसरात वास्तव्य- 9 मे 2006 पासून अबू हमजा फरार- अबू हमजाच्या 10 ते 15 जणांच्या ग्रुपचा सिमीशी संबंध- बीड आणि औरंगाबादमध्ये कार्यरत- पाकिस्तान, सौदी आणि इराणममध्ये वास्तव्य - औरंगाबादमध्ये एटीएसनं अटक केलेले अबरार आणि अखिल खिलजी अबू हमजाचे साथीदार- अबू हमजा 3 इतर प्रकरणात वाँटेड

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2012 10:34 AM IST

26/11 हल्ल्यातील अतिरेकी अबू जिंदालला अटक

25 जून

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका महत्त्वाच्या अतिरेक्याला अटक केलीय. अबू जिंदाल असं त्याचं नाव आहे. ही अटक खूप महत्त्वाची आहे. कारण अजमल कसाबनंतर पोलिसांच्या हाती पहिल्यांदाच लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी लागलाय. सौदी अरेबिया सरकारनं भारत सरकारच्या विनंतीवरून त्याला देशाबाहेर काढलं. आणि दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली, असं समजतंय. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी देण्यात आलीय. हल्ल्याच्यावेळी नरीमन पॉईंटमधल्या अतिरेक्यांना कराचीतल्या कंट्रोल रुममधून 5 जण सूचना देत होते, त्यापैकी अबू जिंदाल हा एक होता अशी माहिती आहे. जिंदालनं अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं तसंच त्यांना हिंदी शिकवली. 2006 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या स्फोटात आणि औरंगाबादमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्यात त्याचा हात होता. तो भारताचा नागरिक असला तरी त्याचं वास्तव्य पाकिस्तानमध्ये होतं.

कोण आहे अबू हमजा ?- अबू हमजा मूळचा बीडचा- मूळ नाव जबीउद्दीन अन्सारी- बीडच्या जुन्या बाजार, किल्ला परिसरात वास्तव्य- 9 मे 2006 पासून अबू हमजा फरार- अबू हमजाच्या 10 ते 15 जणांच्या ग्रुपचा सिमीशी संबंध- बीड आणि औरंगाबादमध्ये कार्यरत- पाकिस्तान, सौदी आणि इराणममध्ये वास्तव्य - औरंगाबादमध्ये एटीएसनं अटक केलेले अबरार आणि अखिल खिलजी अबू हमजाचे साथीदार- अबू हमजा 3 इतर प्रकरणात वाँटेड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2012 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close