S M L

पावसानं दडी मारल्यानं पाणीकपातीचं संकट

27 जूनपावसानं दडी मारल्यानं राज्यात पाण्याची तीव्रटंचाई निर्माण होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पाण्याचं तातडीनं नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदांच्या मुख्याधिकार्‍यांना सरकारनं दिले आहेत. ज्या जलाशयांतून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त शेती, आणि औद्योगिक योजनांसाठी पाणी पुरवले जाते तिथलं पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर बांधकाम व्यावसायिक, हॉटेल्स आणि स्विमिंग पूलच्या पाणीपुरवठ्याबद्दलही निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती पाणी पुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2012 03:00 PM IST

पावसानं दडी मारल्यानं पाणीकपातीचं संकट

27 जून

पावसानं दडी मारल्यानं राज्यात पाण्याची तीव्रटंचाई निर्माण होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पाण्याचं तातडीनं नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदांच्या मुख्याधिकार्‍यांना सरकारनं दिले आहेत. ज्या जलाशयांतून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त शेती, आणि औद्योगिक योजनांसाठी पाणी पुरवले जाते तिथलं पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर बांधकाम व्यावसायिक, हॉटेल्स आणि स्विमिंग पूलच्या पाणीपुरवठ्याबद्दलही निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती पाणी पुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close