S M L

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी 4 डॉक्टरांसह 7 जणांना अटक

27 जूनकोल्हापूरमध्ये गर्भलिंगनिदान व स्त्री-भ्रूण हत्या करणार्‍या रॅकेटमधील 4 डॉक्टरांसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील डॉ.महिंद्र कानडे आणि वैशाली कानडे यांच्या कानडे हॉस्पिटलमध्ये सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर या ठिकाणी गर्भपात केल्याचे पुरावे मिळाले होते. या ठिकाणी गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधं आणि चार महिला आणि रुग्णही आढळले. पण त्याची कुठलीही नोंदणी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली नाही. या रॅकेटला पकडण्यासाठी एका गर्भवती महिलेच्या मदतीनं एक सापळा रचण्यात आला होता. त्यातच डॉ. संतोष मोरे आणि डॉ. ज्ञानदेव दळवी आणि इतर तीन सहकार्‍यांना पकडण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2012 09:36 AM IST

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी 4 डॉक्टरांसह 7 जणांना अटक

27 जून

कोल्हापूरमध्ये गर्भलिंगनिदान व स्त्री-भ्रूण हत्या करणार्‍या रॅकेटमधील 4 डॉक्टरांसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील डॉ.महिंद्र कानडे आणि वैशाली कानडे यांच्या कानडे हॉस्पिटलमध्ये सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर या ठिकाणी गर्भपात केल्याचे पुरावे मिळाले होते. या ठिकाणी गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधं आणि चार महिला आणि रुग्णही आढळले. पण त्याची कुठलीही नोंदणी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली नाही. या रॅकेटला पकडण्यासाठी एका गर्भवती महिलेच्या मदतीनं एक सापळा रचण्यात आला होता. त्यातच डॉ. संतोष मोरे आणि डॉ. ज्ञानदेव दळवी आणि इतर तीन सहकार्‍यांना पकडण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close