S M L

एमपीएससीच्या परीक्षेत सावळा गोंधळ

28 जूनप्रतिष्ठेच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 10 जून रोजी झालेल्या उपजिल्हाधिकारीपदाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक घोळ झाल्याची माहिती मिळतेय. राज्यासाठी कार्यक्षम अधिकार्‍यांची निवड करणार्‍या एमपीएससीच्या या प्रश्नपत्रिकेत अनेक चुकीचे आणि आक्षेपार्ह प्रश्न होते. आधी चुका करायच्या आणि नंतर प्रश्न रद्द करायचे, या आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशयाचा धूर निघू लागला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रश्नपत्रिकेतही असेच घोळ आयोगानं घातले होते. MPSCचा सावळा गोंधळप्रश्न क्रमांक : 134अमेरिकेने कारवाई पूर्ण करून कोणत्या देशातून आपले लष्कर 15 डिसेंबर 2012 रोजी मागे घेतले ? आक्षेप : 15 डिसेंबर 2012 ही तारीखच अजून अलेली नाहीप्रश्न क्रमांक : 135भारत सरकारने मध्यंतरी कोणत्या संकेतस्थळावर बंदी घातली ?आक्षेप : अश्लिल बेवसाईटचा उल्लेख असलेला हा प्रश्नच गैरलागू होता. त्यातही आयोगानं सुचवलेलं उत्तरही चुकीचंप्रश्न क्रमांक : 141स्पर्शगंगा काय आहे ?आक्षेप : आयोग फक्त 3रा पर्याय ग्राह्य धरणार आहे. पण 2रा पर्यायही अचूक आहेप्रश्न क्रमांक : 172खालील संख्या मालिकेत कितीवेळा 6 अंक 3 आणि 4 नंतर आलेत. पण त्या 6 नंतर 7 किंवा 9 हे अंक नाहीत ?आक्षेप : प्रश्न मराठी आणि इंग्रजीत वेगवेगळा आहे. त्यानुसार उत्तरंही बदलतातअसे हे चुकीचे आणि आक्षेपार्ह प्रश्न काढणार्‍या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामाबद्दल काही प्रश्न उपस्थित होताहेत...आयबीएन लोकमतचे सवाल- चुकीच्या उत्तरांबद्दल निगेटिव्ह गुण देणारा आयोग स्वत:च्या चुकीच्या प्रश्नांची जबाबदारी स्वीकारणार का ?- सदोष प्रश्नपत्रिका काढल्याबद्दल आयोग कोणत्या अधिकार्‍यांविरोधात काय कारवाई करणार ?- आयोगाच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान कसे भरून काढणार ?

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2012 04:29 PM IST

एमपीएससीच्या परीक्षेत सावळा गोंधळ

28 जून

प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 10 जून रोजी झालेल्या उपजिल्हाधिकारीपदाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक घोळ झाल्याची माहिती मिळतेय. राज्यासाठी कार्यक्षम अधिकार्‍यांची निवड करणार्‍या एमपीएससीच्या या प्रश्नपत्रिकेत अनेक चुकीचे आणि आक्षेपार्ह प्रश्न होते. आधी चुका करायच्या आणि नंतर प्रश्न रद्द करायचे, या आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशयाचा धूर निघू लागला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रश्नपत्रिकेतही असेच घोळ आयोगानं घातले होते.

MPSCचा सावळा गोंधळप्रश्न क्रमांक : 134अमेरिकेने कारवाई पूर्ण करून कोणत्या देशातून आपले लष्कर 15 डिसेंबर 2012 रोजी मागे घेतले ? आक्षेप : 15 डिसेंबर 2012 ही तारीखच अजून अलेली नाही

प्रश्न क्रमांक : 135भारत सरकारने मध्यंतरी कोणत्या संकेतस्थळावर बंदी घातली ?आक्षेप : अश्लिल बेवसाईटचा उल्लेख असलेला हा प्रश्नच गैरलागू होता. त्यातही आयोगानं सुचवलेलं उत्तरही चुकीचं

प्रश्न क्रमांक : 141स्पर्शगंगा काय आहे ?आक्षेप : आयोग फक्त 3रा पर्याय ग्राह्य धरणार आहे. पण 2रा पर्यायही अचूक आहेप्रश्न क्रमांक : 172खालील संख्या मालिकेत कितीवेळा 6 अंक 3 आणि 4 नंतर आलेत. पण त्या 6 नंतर 7 किंवा 9 हे अंक नाहीत ?आक्षेप : प्रश्न मराठी आणि इंग्रजीत वेगवेगळा आहे. त्यानुसार उत्तरंही बदलतात

असे हे चुकीचे आणि आक्षेपार्ह प्रश्न काढणार्‍या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामाबद्दल काही प्रश्न उपस्थित होताहेत...आयबीएन लोकमतचे सवाल- चुकीच्या उत्तरांबद्दल निगेटिव्ह गुण देणारा आयोग स्वत:च्या चुकीच्या प्रश्नांची जबाबदारी स्वीकारणार का ?- सदोष प्रश्नपत्रिका काढल्याबद्दल आयोग कोणत्या अधिकार्‍यांविरोधात काय कारवाई करणार ?- आयोगाच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान कसे भरून काढणार ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2012 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close