S M L

पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

02 जुलैजैवविविधतेनं समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोनं पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न केले जातायत या प्रयत्नांना यामुळे उभारी मिळेल. पण पश्चिम घाट वाचवण्यासाठी सरकार काही ठोस अंमलबजावणी करणार आहे की नाही हा प्रश्न आहे. गच्च हिरवाईच्या डोंगररांगा... कोसळणारा पाऊस..दाट धुकं आणि धबधब्यांचा प्रदेश...भारतातल्या मान्सूनवर प्रभाव पाडणारा पश्चिम घाटाचा हा 1600 किलोमीटरचा लांबचलांब टापू, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमधल्या या भागाला आता जागतिक वारशाचा दर्जा मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम घाटाची वैशिष्ट्यं अवघ्या जगाच्या समोर आली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेलं कास पठार, कोयना, चांदोली आणि राधानगरीचं दाजीपूर अभयारण्य, आंबोली या ठिकाणांची दखल आता जागतिक पातळीवर घेतली गेलीय. त्याचबरोबर गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतल्या समृद्ध जंगलांचाही यात अंतर्भाव आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं आता जाहीर केला. पण, त्याच्या अंमलबजवाणीबद्दल केंद्र आणि राज्य सरकारं गंभीर नाहीत, अशी टीका या समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी केलीय. बेसुमार मायनिंग, येऊ घातलेले औष्णिक प्रकल्प, प्रदूषणकारी रासायनिक प्रकल्प यामुळे पश्चिम घाट धोक्यात आलाय. त्यामुळे फक्त या भागाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देऊन भागणार नाही तर पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी पर्यावरण कायद्यांचीही काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी,असं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेली 39 ठिकाणं पश्चिम घाटातल्या ज्या पर्वतरांगामध्ये आहेत त्या पर्वतरांगा कोणकोणत्या आहेत सह्याद्रीकुद्रेमुखतलईकावेरीनिलगिरीअन्नामलाईपेरियारअगस्तिमलाईपश्चिम घाटाची शान - हिमालय पर्वतरांगांपेक्षाही प्राचीन- जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न- भारताच्या मान्सूनवर प्रभाव- पक्षीप्राण्यांच्या विशिष्ट प्रजातींचा याच भागात आढळ- जैवविविधतेच्या बाबतीत जगातल्या 8 जागांमध्ये समावेश- तापी, कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचा उगमजागतिक वारशाची जगातली ठिकाणं- ग्रेट वॉल ऑफ चायना- स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, अमेरिका- ग्रँड कॅनियन, अमेरिका- ग्रेट बॅरियर रिफ, ऑस्ट्रेलिया- पिसाचा झुलता मनोरा, इटलीभारतातली ठिकाणं- ताजमहाल- अजिंठा एलोरा- कोणार्क मंदिर, ओरिसा- व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हिमाचल प्रदेश- भरतपूर अभयारण्य, राजस्थान- दाजिर्लिंग हिमालयीन रेल्वे- काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम- पश्चिम घाट

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 11:03 AM IST

पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

02 जुलै

जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोनं पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न केले जातायत या प्रयत्नांना यामुळे उभारी मिळेल. पण पश्चिम घाट वाचवण्यासाठी सरकार काही ठोस अंमलबजावणी करणार आहे की नाही हा प्रश्न आहे.

गच्च हिरवाईच्या डोंगररांगा... कोसळणारा पाऊस..दाट धुकं आणि धबधब्यांचा प्रदेश...भारतातल्या मान्सूनवर प्रभाव पाडणारा पश्चिम घाटाचा हा 1600 किलोमीटरचा लांबचलांब टापू, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमधल्या या भागाला आता जागतिक वारशाचा दर्जा मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम घाटाची वैशिष्ट्यं अवघ्या जगाच्या समोर आली.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेलं कास पठार, कोयना, चांदोली आणि राधानगरीचं दाजीपूर अभयारण्य, आंबोली या ठिकाणांची दखल आता जागतिक पातळीवर घेतली गेलीय. त्याचबरोबर गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतल्या समृद्ध जंगलांचाही यात अंतर्भाव आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं आता जाहीर केला. पण, त्याच्या अंमलबजवाणीबद्दल केंद्र आणि राज्य सरकारं गंभीर नाहीत, अशी टीका या समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी केलीय.

बेसुमार मायनिंग, येऊ घातलेले औष्णिक प्रकल्प, प्रदूषणकारी रासायनिक प्रकल्प यामुळे पश्चिम घाट धोक्यात आलाय. त्यामुळे फक्त या भागाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देऊन भागणार नाही तर पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी पर्यावरण कायद्यांचीही काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी,असं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे.

वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेली 39 ठिकाणं पश्चिम घाटातल्या ज्या पर्वतरांगामध्ये आहेत त्या पर्वतरांगा कोणकोणत्या आहेत

सह्याद्रीकुद्रेमुखतलईकावेरीनिलगिरीअन्नामलाईपेरियारअगस्तिमलाई

पश्चिम घाटाची शान

- हिमालय पर्वतरांगांपेक्षाही प्राचीन- जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न- भारताच्या मान्सूनवर प्रभाव- पक्षीप्राण्यांच्या विशिष्ट प्रजातींचा याच भागात आढळ- जैवविविधतेच्या बाबतीत जगातल्या 8 जागांमध्ये समावेश- तापी, कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचा उगम

जागतिक वारशाची जगातली ठिकाणं

- ग्रेट वॉल ऑफ चायना- स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, अमेरिका- ग्रँड कॅनियन, अमेरिका- ग्रेट बॅरियर रिफ, ऑस्ट्रेलिया- पिसाचा झुलता मनोरा, इटली

भारतातली ठिकाणं

- ताजमहाल- अजिंठा एलोरा- कोणार्क मंदिर, ओरिसा- व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हिमाचल प्रदेश- भरतपूर अभयारण्य, राजस्थान- दाजिर्लिंग हिमालयीन रेल्वे- काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम- पश्चिम घाट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close