S M L

दिल्ली स्फोट प्रकरणी संशयित अतिरेकी अटकेत

30 जूनमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ला प्रकरणी अबू जुंदाल पाठोपाठ आज सौदे अरेबियात एका संशयित अतिरेक्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. फसिह मोहम्मद असं अटक करण्यात आलेल्या या अतिरेक्याचं नाव असून भारतात दिल्ली, बंगळुरु आणि चेन्नईत झालेल्या स्फोटाशी त्याचा संबंध असण्याची माहिती मिळतेय. भारतीय अधिकारी सौदीच्या संपर्कात असून फसिहला लवकरच भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे. इंटरपोलनं फसिहविरुध्द रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे. तर आज बीड जिल्ह्यातल्या पोखरी गावातून 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गेवराई पोलिसांनी ही कारवाई केली. अबु जुंदालच्या अटकेनंतर ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या 5 जणांपैकी 3 जण उत्तर प्रदेशातील आहेत आणि हे तीनही जण मदरशात काम करतात. कलीम अली, जियाउल हक आणि मोहम्मद अदनान अशी या 3 जणांची नावं आहेत. तर अन्य दोन जण हे गेवराई तालुक्यातलेच आहेत. शेख जफर आणि नुजत नियामतयात जाफर अशी त्यांची नावं आहेत. पोखरीतल्या एका पडक्या घरात हे सर्वजण राहत होते. या सर्वांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2012 05:07 PM IST

दिल्ली स्फोट प्रकरणी संशयित अतिरेकी अटकेत

30 जून

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ला प्रकरणी अबू जुंदाल पाठोपाठ आज सौदे अरेबियात एका संशयित अतिरेक्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. फसिह मोहम्मद असं अटक करण्यात आलेल्या या अतिरेक्याचं नाव असून भारतात दिल्ली, बंगळुरु आणि चेन्नईत झालेल्या स्फोटाशी त्याचा संबंध असण्याची माहिती मिळतेय. भारतीय अधिकारी सौदीच्या संपर्कात असून फसिहला लवकरच भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे. इंटरपोलनं फसिहविरुध्द रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे.

तर आज बीड जिल्ह्यातल्या पोखरी गावातून 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गेवराई पोलिसांनी ही कारवाई केली. अबु जुंदालच्या अटकेनंतर ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या 5 जणांपैकी 3 जण उत्तर प्रदेशातील आहेत आणि हे तीनही जण मदरशात काम करतात. कलीम अली, जियाउल हक आणि मोहम्मद अदनान अशी या 3 जणांची नावं आहेत. तर अन्य दोन जण हे गेवराई तालुक्यातलेच आहेत. शेख जफर आणि नुजत नियामतयात जाफर अशी त्यांची नावं आहेत. पोखरीतल्या एका पडक्या घरात हे सर्वजण राहत होते. या सर्वांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2012 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close