S M L

चव्हाणांनी फोडलं सचिवांवर खापर

02 जूलैआदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची साक्ष आज पूर्ण झाली. आज त्यांच्या साक्षीचा दुसरा भाग होता. त्यांनीही सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांचा कित्ता गिरवत घोटाळ्याचं खापर अधिकार्‍यांवर फोडलं. मला आता डिटेल्स माहिती नाहीत, मी चांगल्या हेतूनं सही केली अशी साक्ष त्यांनी आयोगासमोर दिली. त्यावेळच्या महसूल विभागांच्या प्रधान सचिवांच्या म्हणण्यानुसार कारवाई केल्याचं त्यांचं म्हणणंय. गेल्या वेळेस अशोक चव्हाणांनी विलासराव देशमुखांवर आदर्श घोटाळ्याचं खापर फोडलं होतं. त्याआधी विलासरावांनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवलं होतं.अशोक चव्हाणांची 'आदर्श' साक्ष 'जमिनीशी संबंधित व्यवहार महसूल मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. पण मुंबई, मुंबई उपनगरे आणि पुणे शहर इथल्या सरकारी जमिनींचं वाटप थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं. आदर्शच्या जमिनीवरचा स्थगनादेश मी सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतरच उठवला. आदर्शचे प्रवर्तक गिडवाणी यांनी मला लिहिलेले पत्र मी आज पहिल्यांदाच पाहतोय. त्यावर कुणी सही केली, हे मी ओळखू शकत नाही. आदर्शच्या प्रस्तावित जागेवर आधी खुकरी पार्क होतं, हे मला ठाऊक नव्हतं. महसूल मंत्रालयात मोठ्या संख्येने फाइल्स असतात; प्रत्येक फाईलचा प्रत्येक कागद वाचणं शक्य नसतं. आदर्श सोसायटी निवृत्त सैनिकांसाठी होती, हे मला गिडवाणींनी सुरुवातीला सांगितलं नाही. गिडवाणींनी दिलेल्या पत्रात सीआरझे (CRZ) आणि लष्करच्या आक्षेपांबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती. आदर्श सोसायटीत बिगरलष्करी नागरिकांना समाविष्ट करण्याची शिफारस मी नाही केली; ती कोणी केली, हे मला माहीत नाही.'

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 09:19 AM IST

चव्हाणांनी फोडलं सचिवांवर खापर

02 जूलै

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची साक्ष आज पूर्ण झाली. आज त्यांच्या साक्षीचा दुसरा भाग होता. त्यांनीही सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांचा कित्ता गिरवत घोटाळ्याचं खापर अधिकार्‍यांवर फोडलं. मला आता डिटेल्स माहिती नाहीत, मी चांगल्या हेतूनं सही केली अशी साक्ष त्यांनी आयोगासमोर दिली. त्यावेळच्या महसूल विभागांच्या प्रधान सचिवांच्या म्हणण्यानुसार कारवाई केल्याचं त्यांचं म्हणणंय. गेल्या वेळेस अशोक चव्हाणांनी विलासराव देशमुखांवर आदर्श घोटाळ्याचं खापर फोडलं होतं. त्याआधी विलासरावांनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवलं होतं.

अशोक चव्हाणांची 'आदर्श' साक्ष

'जमिनीशी संबंधित व्यवहार महसूल मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. पण मुंबई, मुंबई उपनगरे आणि पुणे शहर इथल्या सरकारी जमिनींचं वाटप थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं. आदर्शच्या जमिनीवरचा स्थगनादेश मी सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतरच उठवला. आदर्शचे प्रवर्तक गिडवाणी यांनी मला लिहिलेले पत्र मी आज पहिल्यांदाच पाहतोय. त्यावर कुणी सही केली, हे मी ओळखू शकत नाही. आदर्शच्या प्रस्तावित जागेवर आधी खुकरी पार्क होतं, हे मला ठाऊक नव्हतं. महसूल मंत्रालयात मोठ्या संख्येने फाइल्स असतात; प्रत्येक फाईलचा प्रत्येक कागद वाचणं शक्य नसतं. आदर्श सोसायटी निवृत्त सैनिकांसाठी होती, हे मला गिडवाणींनी सुरुवातीला सांगितलं नाही. गिडवाणींनी दिलेल्या पत्रात सीआरझे (CRZ) आणि लष्करच्या आक्षेपांबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती. आदर्श सोसायटीत बिगरलष्करी नागरिकांना समाविष्ट करण्याची शिफारस मी नाही केली; ती कोणी केली, हे मला माहीत नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close