S M L

'एनसीईआरटीच्या पुस्तकातून व्यंगचित्र वगळावीत'

श्रेया धौंडियाल, नवी दिल्ली 03 जुलैवादग्रस्त एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्रावरुन वाद पेटलाय. या वादामुळे संसदेचं कामकाजही अनेकवेळा स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर याबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आपला अहवाल तयार केला. हा अहवाल आयबीएन नेटवर्कच्या हाती लागला आहे. एनसीईआरटी अभ्यासक्रमातलं बाबासाहेबांचं वादग्रस्त व्यंगचित्र काढून टाकावं. त्याचबरोबर इतरही अनेक व्यंगचित्रं काढून टाकावीत, अशा शिफारसी या अहवालात करण्यात आल्या आहेत. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यात आलेल्या व्यंगचित्रांवरुन वाद झाला आणि मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीनं सुचवलेल्या शिफारशी आयबीएन नेटवर्कच्या हाती लागल्यायत. या शिफारसी मंजूर झाल्या तर NCERT अभ्यासक्रमातून 43 व्यंगचित्रं काढून टाकली जातील. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांचा या शिफारशींवर आक्षेप आहे. फक्त आंबेडकरच नाही तर नेहरू, गांधी कुटुंबांतल्या अनेकांवर व्यंगचित्र या पुस्तकांत आहेत. इंदिरा गांधींवरची अनेक व्यंगचित्रं राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असल्याचं समितीचं म्हणणंय. अशी 14 व्यंगचित्र काढून टाकावीत, असं थोरात समितीनं सुचवलंय. जवाहरलाल नेहरू यांची 9 व्यंगचित्रं काढण्याची शिफारसही करण्यात आली. सुखदेव थोरात यांच्या समितीचा अहवाल दोषपूर्ण असल्याचा आरोप होतोय. समितीचे सदस्य प्राध्यापक पांडियन यांनी अहवालावर स्वाक्षरी करायलाही नकार दिलाय. व्यंगचित्रांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या काहीही गैर नसल्याचं त्यांचं म्हणणंय. पण वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप असलेल्या भारतासारख्या देशात कुठल्याही संवेदनशील मुद्द्याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे, असं थोरात यांचं म्हणणंय. समितीचा अहवाल आता मंजुरीसाठी NCERT आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवला जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 05:13 PM IST

'एनसीईआरटीच्या पुस्तकातून व्यंगचित्र वगळावीत'

श्रेया धौंडियाल, नवी दिल्ली

03 जुलै

वादग्रस्त एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्रावरुन वाद पेटलाय. या वादामुळे संसदेचं कामकाजही अनेकवेळा स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर याबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आपला अहवाल तयार केला. हा अहवाल आयबीएन नेटवर्कच्या हाती लागला आहे. एनसीईआरटी अभ्यासक्रमातलं बाबासाहेबांचं वादग्रस्त व्यंगचित्र काढून टाकावं. त्याचबरोबर इतरही अनेक व्यंगचित्रं काढून टाकावीत, अशा शिफारसी या अहवालात करण्यात आल्या आहेत.

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यात आलेल्या व्यंगचित्रांवरुन वाद झाला आणि मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीनं सुचवलेल्या शिफारशी आयबीएन नेटवर्कच्या हाती लागल्यायत. या शिफारसी मंजूर झाल्या तर NCERT अभ्यासक्रमातून 43 व्यंगचित्रं काढून टाकली जातील. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांचा या शिफारशींवर आक्षेप आहे.

फक्त आंबेडकरच नाही तर नेहरू, गांधी कुटुंबांतल्या अनेकांवर व्यंगचित्र या पुस्तकांत आहेत. इंदिरा गांधींवरची अनेक व्यंगचित्रं राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असल्याचं समितीचं म्हणणंय. अशी 14 व्यंगचित्र काढून टाकावीत, असं थोरात समितीनं सुचवलंय. जवाहरलाल नेहरू यांची 9 व्यंगचित्रं काढण्याची शिफारसही करण्यात आली. सुखदेव थोरात यांच्या समितीचा अहवाल दोषपूर्ण असल्याचा आरोप होतोय. समितीचे सदस्य प्राध्यापक पांडियन यांनी अहवालावर स्वाक्षरी करायलाही नकार दिलाय. व्यंगचित्रांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या काहीही गैर नसल्याचं त्यांचं म्हणणंय. पण वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप असलेल्या भारतासारख्या देशात कुठल्याही संवेदनशील मुद्द्याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे, असं थोरात यांचं म्हणणंय. समितीचा अहवाल आता मंजुरीसाठी NCERT आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close