S M L

'शरद पवार विश्वासू व्यक्ती नाही'

04 जुलैशरद पवार हे विश्वास ठेवण्यासाठी योग्य व्यक्ती नाहीत, ते सतत भूमिका बदलणारे आणि चंचल नेते आहेत असा शेरा मारला दिवंगत काँग्रेस नेते अर्जुनसिंग यांनी. त्यांनी स्वत : लिहीलेल्या 'ए ग्रेन ऑफ सँण्ड इन दी आवरग्लास ऑफ टाईम' या आत्मचरित्रात त्यांनी हे मत मांडलंय. अर्जुनसिंग यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित होतंय. यामध्येच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अर्जुनसिंग यांचे काँग्रेस पक्षातील एक सहकारी शरद पवार यांच्या बद्दल हे शेरे मारले आहेत. पवार यांच्याबद्दल लिहिताना अर्जुनसिंग असंही म्हणतात की, "जेव्हा शरद पवार 80 च्या दशकात काँग्रेसमध्ये परतणार होते तेव्हा त्यांना प्रवेश देणार्‍या राजीव गांधींना मी निर्णयाचा पुनर्विचार करावा असंही म्हटलं होतं. पवारांचा इतिहास अशा प्रकारे प्रवेश देण्याइतका चांगला नाही असं मी राजीवजींना म्हटलं. माझं म्हणणं, पवारांनी सोनियांच्या विदेशी वंशाचा मुद्दा काढला तेव्हा खरं ठरलं" अर्जुनसिंग हे शरद पवार यांचे पी. व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या काळात मंत्री मंडळातले सहकारी होते. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणातले शरद पवारांचे सातत्याने प्रतिस्पर्धी राहीलेल्या अर्जुन सिंग यांचे हे आत्म चरीत्र येत्या काही दिवसांत प्रकाशित होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2012 05:39 PM IST

'शरद पवार विश्वासू व्यक्ती नाही'

04 जुलैशरद पवार हे विश्वास ठेवण्यासाठी योग्य व्यक्ती नाहीत, ते सतत भूमिका बदलणारे आणि चंचल नेते आहेत असा शेरा मारला दिवंगत काँग्रेस नेते अर्जुनसिंग यांनी. त्यांनी स्वत : लिहीलेल्या 'ए ग्रेन ऑफ सँण्ड इन दी आवरग्लास ऑफ टाईम' या आत्मचरित्रात त्यांनी हे मत मांडलंय.

अर्जुनसिंग यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित होतंय. यामध्येच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अर्जुनसिंग यांचे काँग्रेस पक्षातील एक सहकारी शरद पवार यांच्या बद्दल हे शेरे मारले आहेत. पवार यांच्याबद्दल लिहिताना अर्जुनसिंग असंही म्हणतात की, "जेव्हा शरद पवार 80 च्या दशकात काँग्रेसमध्ये परतणार होते तेव्हा त्यांना प्रवेश देणार्‍या राजीव गांधींना मी निर्णयाचा पुनर्विचार करावा असंही म्हटलं होतं. पवारांचा इतिहास अशा प्रकारे प्रवेश देण्याइतका चांगला नाही असं मी राजीवजींना म्हटलं. माझं म्हणणं, पवारांनी सोनियांच्या विदेशी वंशाचा मुद्दा काढला तेव्हा खरं ठरलं" अर्जुनसिंग हे शरद पवार यांचे पी. व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या काळात मंत्री मंडळातले सहकारी होते. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणातले शरद पवारांचे सातत्याने प्रतिस्पर्धी राहीलेल्या अर्जुन सिंग यांचे हे आत्म चरीत्र येत्या काही दिवसांत प्रकाशित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2012 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close