S M L

चंद्रपुरात 100 कोटींचा खाण घोटाळा

05 जुलैविदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही एक खाण घोटाळा उघड झाला आहे. भद्रावती तालुक्यातल्या ब्रांज गावाजवळ, कर्नाटक एम्टा कंपनीने कुठल्याही परवानगीशिवाय जवळपास दीड महिना अवैध उत्खनन केल्याचं समोर आलंय. 100 एकर जमिनीतून 5 लाख टन ब्रास कोळशाचं अवैध उत्खनन केल्याची धक्कादायक माहिती, माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे. त्यानंतर या कंपनीला 100 कोटींचा महसूल भरण्याचे आदेश दिले गेले होते, पण या कंपनीनं कुठलाही महसूल भरला नाही. महत्वाचे म्हणजे त्यानंतर या कंपनीवर जिल्हाधिकार्‍यांनी कुठलीही कारवाई केली नाही. कुठलाही दंड या कंपनीला करण्यात आला नाही. या कंपनीला जिल्हाधिकारी आणि इतर सरकारी अधिकारी पाठिशी घालतायत असा आरोप करण्यात येतोय. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काळ सोनं म्हणजेच कोळशाच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत गेल्या काही वर्षात राज्य सरकारनं या भागात अनेक खाजगी उद्योजकांना खाणीची परवानगी दिली आहे. भद्रावती तालुक्यातील ब्रांज गावाजवळ कर्णाटक एम्टा या कंपनीला शासनानं जुलै 2008 ला 200 एकर जागेवर खाणीची परवानगी दिली होती यात राज्य सरकारनं कंपनीशी करार केला पण या जागे शिवाय कर्नाटक एम्टा या कंपनी नेे कुठल्या ही परवानगी शिवाय 100 एकर जमीनीतून अवैध खोदकाम करून 5 लाख टन ब्रास टन कोळसा काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कंपनीला परवानगी असलेल्या जमिनीच्या शेजारच्या सर्वे नं. 375,354,368,347,48 345,356 या ज्‌मनीवर 5 एप्रिल 2011 पासून तर 21 जून 2011 पर्यत अवैध उत्खनन केले याची माहिती संबंधीत तलाठी यांनी कर्नाटक एम्टा कंपनीला 100 कोटी च्या महसूल भरण्याचे पत्र दिले याची माहिती जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना दिली. पण या संबधी जिल्हाधिकारी यांनी कोट्यावधी चा महसूल बुडवून ही कंपनीवर कोणती ही कार्रवाई केली नाही याची माहिती तलाठी यांनी माहितीच्या अधिकारीतून मिळवलेल्या पत्रात स्पष्ट झाले तलाठीने आरोप केला आहे, 'की या प्रकरणाला जिल्हाधिकारी तहसिलदार आणि खनीकर्म अधिका-यांनी बगल दिली. संबंधीत तलाठी खोब्रगाडे यांनी शासनाला कार्रवाई बाबत माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता तहसीलदार यांनी तलाठी यांना अशी माहिती देण्यास नकार दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 09:55 AM IST

चंद्रपुरात 100 कोटींचा खाण घोटाळा

05 जुलै

विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही एक खाण घोटाळा उघड झाला आहे. भद्रावती तालुक्यातल्या ब्रांज गावाजवळ, कर्नाटक एम्टा कंपनीने कुठल्याही परवानगीशिवाय जवळपास दीड महिना अवैध उत्खनन केल्याचं समोर आलंय. 100 एकर जमिनीतून 5 लाख टन ब्रास कोळशाचं अवैध उत्खनन केल्याची धक्कादायक माहिती, माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे.

त्यानंतर या कंपनीला 100 कोटींचा महसूल भरण्याचे आदेश दिले गेले होते, पण या कंपनीनं कुठलाही महसूल भरला नाही. महत्वाचे म्हणजे त्यानंतर या कंपनीवर जिल्हाधिकार्‍यांनी कुठलीही कारवाई केली नाही. कुठलाही दंड या कंपनीला करण्यात आला नाही. या कंपनीला जिल्हाधिकारी आणि इतर सरकारी अधिकारी पाठिशी घालतायत असा आरोप करण्यात येतोय.

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काळ सोनं म्हणजेच कोळशाच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत गेल्या काही वर्षात राज्य सरकारनं या भागात अनेक खाजगी उद्योजकांना खाणीची परवानगी दिली आहे. भद्रावती तालुक्यातील ब्रांज गावाजवळ कर्णाटक एम्टा या कंपनीला शासनानं जुलै 2008 ला 200 एकर जागेवर खाणीची परवानगी दिली होती यात राज्य सरकारनं कंपनीशी करार केला पण या जागे शिवाय कर्नाटक एम्टा या कंपनी नेे कुठल्या ही परवानगी शिवाय 100 एकर जमीनीतून अवैध खोदकाम करून 5 लाख टन ब्रास टन कोळसा काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

कंपनीला परवानगी असलेल्या जमिनीच्या शेजारच्या सर्वे नं. 375,354,368,347,48 345,356 या ज्‌मनीवर 5 एप्रिल 2011 पासून तर 21 जून 2011 पर्यत अवैध उत्खनन केले याची माहिती संबंधीत तलाठी यांनी कर्नाटक एम्टा कंपनीला 100 कोटी च्या महसूल भरण्याचे पत्र दिले याची माहिती जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना दिली. पण या संबधी जिल्हाधिकारी यांनी कोट्यावधी चा महसूल बुडवून ही कंपनीवर कोणती ही कार्रवाई केली नाही याची माहिती तलाठी यांनी माहितीच्या अधिकारीतून मिळवलेल्या पत्रात स्पष्ट झाले तलाठीने आरोप केला आहे, 'की या प्रकरणाला जिल्हाधिकारी तहसिलदार आणि खनीकर्म अधिका-यांनी बगल दिली. संबंधीत तलाठी खोब्रगाडे यांनी शासनाला कार्रवाई बाबत माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता तहसीलदार यांनी तलाठी यांना अशी माहिती देण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close