S M L

26/11 हल्ल्यात आमचा हात नाही:पाक

05 जुलैमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आमचा हात नाही असा कांगावा पाकिस्तानने केलाय. पण अबू जुंदाल प्रकरणी पाकनं कानावर हात ठेवले. उलट 26/11 च्या हल्ल्यातील पुरावे द्यावेत अशा उलट्याबोंबही मारल्यात. भारताने अबु जुंदालचे पुरावे पाकिस्तान पुढे ठेवले. पण यावर काही बोलायला पाक तयार नसल्याच समोर आलंय. उलट जुंदाल प्रकरणाच्या संयुक्त चौकशीसाठी पाक तयार असल्याचं पाकच्या परराष्ट्र सचिवांनी सांगून टाकलं.आज दोन्ही देशांच्या सचिवांची दोन दिवसीय सचिव बैठक सुरु झाली आहे. भारतीय परराष्ट्रसचिव रंजन मथई आणि पाकचे परराष्ट्रसचिव जलिन अब्बास जिलानी यांनी आज चर्चा करुन पत्रकार परिषद घेतली. दोन्ही देशांचे संबंध सुधारले पाहिजे यावर भर देणे जरुरी आहे. एकमेकांवर विश्वास ठेवणे गरजेच आहे असं मत सचिव रंजन मथई यांनी व्यक्त केलं. तसेच दहशतवादाविरोधात संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे असंही मथई म्हणाले. यावेळी 26/11 हल्ल्यातील हाती अटकेत असलेल्या अबू जुंदाल उर्फ जबिउद्दीन अन्सारी यांचे पुरावे पाक सचिवांपुढे सादर केले पण यावर त्यांनी शांत राहणे पसंत केले. दहशतवादाविरोधात आम्ही सहकार्य करु पण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोणत्याही एंजन्सीचा सहभाग नव्हता असा खुलासा केला. येत्या सप्टेंबर महिन्यात पाकमध्ये दोन्ही देशांच्या सचिवांची पुन्हा एकदा भेट होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 10:23 AM IST

26/11 हल्ल्यात आमचा हात नाही:पाक

05 जुलै

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आमचा हात नाही असा कांगावा पाकिस्तानने केलाय. पण अबू जुंदाल प्रकरणी पाकनं कानावर हात ठेवले. उलट 26/11 च्या हल्ल्यातील पुरावे द्यावेत अशा उलट्याबोंबही मारल्यात. भारताने अबु जुंदालचे पुरावे पाकिस्तान पुढे ठेवले. पण यावर काही बोलायला पाक तयार नसल्याच समोर आलंय. उलट जुंदाल प्रकरणाच्या संयुक्त चौकशीसाठी पाक तयार असल्याचं पाकच्या परराष्ट्र सचिवांनी सांगून टाकलं.

आज दोन्ही देशांच्या सचिवांची दोन दिवसीय सचिव बैठक सुरु झाली आहे. भारतीय परराष्ट्रसचिव रंजन मथई आणि पाकचे परराष्ट्रसचिव जलिन अब्बास जिलानी यांनी आज चर्चा करुन पत्रकार परिषद घेतली. दोन्ही देशांचे संबंध सुधारले पाहिजे यावर भर देणे जरुरी आहे. एकमेकांवर विश्वास ठेवणे गरजेच आहे असं मत सचिव रंजन मथई यांनी व्यक्त केलं. तसेच दहशतवादाविरोधात संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे असंही मथई म्हणाले. यावेळी 26/11 हल्ल्यातील हाती अटकेत असलेल्या अबू जुंदाल उर्फ जबिउद्दीन अन्सारी यांचे पुरावे पाक सचिवांपुढे सादर केले पण यावर त्यांनी शांत राहणे पसंत केले. दहशतवादाविरोधात आम्ही सहकार्य करु पण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोणत्याही एंजन्सीचा सहभाग नव्हता असा खुलासा केला. येत्या सप्टेंबर महिन्यात पाकमध्ये दोन्ही देशांच्या सचिवांची पुन्हा एकदा भेट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close