S M L

महापालिकेच्या शाळेत संस्थाचालकाची घुसखोरी

अलका धुपकर, मुंबई 05 जुलैगोरेगाव इथल्या बिंबिसार नगरमधल्या महापालिकेच्या शाळेत एका खाजगी संस्थाचालकाने बेकायदेशीर शाळा सुरु केली आहे. राज्य बाल हक्क आयोगाने ही शाळा बेकायदेशीर ठरवली आहे. महापौर सुनील प्रभू यांच्या वॉर्डातल्या महापालिका ट्रांझिट कॅम्प शाळेची अवस्था पालिकेने दयनीय करुन टाकलीय. शाळांमधले विद्यार्थी टप्प्याटप्प्याने कमी करुन त्याच इमारतीत खाजगी शाळा कशा सुरु होतात हे यानिमित्तानं शिक्षण हक्क समितीनं उघड केलंय. तब्बल 500 विद्यार्थी शिकू शकतील, एवढ्या क्षमतेची पालिकेची शाळा. याच इमारतीमध्ये पालिकेची मुंबई पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाचीही शाळा भरते. पण, शाळेला शिक्षक ना पुरेसे शिक्षक आहेत ना इतर सुविधा...ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत घातलं त्यांना मुलं शाळेतून काढायला भाग पाडण्यात आलं.पालिकेच्या शाळेला कंटाळून खाजगी शाळेत प्रवेश घेतलेल्या या पालकांची आता कोंडी झालेय कारण, ही शाळाच आता बेकायदेशीर ठरवण्यात आली. तरीही, महापौरांच्या वॉर्डातल्या या शाळेमध्ये आपलं स्वागत होतं ते खाजगी शाळेच्या फलकांनी.संस्थाचालक सुदर्शन पांडे यांनी सोसायटी ऍक्टचा भंग करत चुकीच्या पद्धतीने संचालक मंडळ नेमलं. आणि पालिकेच्या इमारतीवर कब्जा केलाय.शाळेत मुख्याध्यापकांची नेमणूक गेल्या अनेक वर्षात झालेलीच नाही. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सुदर्शन गैरकारभारांचे अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवतात. महापौरांच्या वॉर्डातली बीएमसी शाळा कात कधी टाकणार अनधिकृत शाळा बंद कधी होणार ? याची उत्तरं काही त्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पाठवली जात नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 03:06 PM IST

महापालिकेच्या शाळेत संस्थाचालकाची घुसखोरी

अलका धुपकर, मुंबई

05 जुलै

गोरेगाव इथल्या बिंबिसार नगरमधल्या महापालिकेच्या शाळेत एका खाजगी संस्थाचालकाने बेकायदेशीर शाळा सुरु केली आहे. राज्य बाल हक्क आयोगाने ही शाळा बेकायदेशीर ठरवली आहे. महापौर सुनील प्रभू यांच्या वॉर्डातल्या महापालिका ट्रांझिट कॅम्प शाळेची अवस्था पालिकेने दयनीय करुन टाकलीय. शाळांमधले विद्यार्थी टप्प्याटप्प्याने कमी करुन त्याच इमारतीत खाजगी शाळा कशा सुरु होतात हे यानिमित्तानं शिक्षण हक्क समितीनं उघड केलंय.

तब्बल 500 विद्यार्थी शिकू शकतील, एवढ्या क्षमतेची पालिकेची शाळा. याच इमारतीमध्ये पालिकेची मुंबई पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाचीही शाळा भरते. पण, शाळेला शिक्षक ना पुरेसे शिक्षक आहेत ना इतर सुविधा...ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत घातलं त्यांना मुलं शाळेतून काढायला भाग पाडण्यात आलं.

पालिकेच्या शाळेला कंटाळून खाजगी शाळेत प्रवेश घेतलेल्या या पालकांची आता कोंडी झालेय कारण, ही शाळाच आता बेकायदेशीर ठरवण्यात आली. तरीही, महापौरांच्या वॉर्डातल्या या शाळेमध्ये आपलं स्वागत होतं ते खाजगी शाळेच्या फलकांनी.

संस्थाचालक सुदर्शन पांडे यांनी सोसायटी ऍक्टचा भंग करत चुकीच्या पद्धतीने संचालक मंडळ नेमलं. आणि पालिकेच्या इमारतीवर कब्जा केलाय.

शाळेत मुख्याध्यापकांची नेमणूक गेल्या अनेक वर्षात झालेलीच नाही. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सुदर्शन गैरकारभारांचे अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवतात. महापौरांच्या वॉर्डातली बीएमसी शाळा कात कधी टाकणार अनधिकृत शाळा बंद कधी होणार ? याची उत्तरं काही त्यांना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पाठवली जात नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close