S M L

साईंच्या चरणी 4 कोटी रुपये दान

05 जुलैशिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात साईभक्तांनी तब्बल चार कोटी पंधरा लाख रुपये दान म्हणून दिले आहेत. गुरुपोर्णिमेला आपल्या गुरुला काहीतरी दान देण्याची हजारो वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. साईबाबांना गुरु मानणार्‍या भक्तांनी दानपेटीत 2 कोटी 62 लाख, डोनेशन काऊंटरवर 63 लाख रुपये, सोने 750 ग्रॅम, चांदी 5 किलो आणि याचबरोबर 31 देशांचे विदेशी चलन असे एकूण 4 कोटी 15 लाख रुपये तीन दिवसात दान केले आहेत. विशेष म्हणजे परदेशी चलनातील दानामध्ये यावर्षी मोठी वाढ झालेली आहे. गेल्या एका वर्षामध्ये तब्बल 4 कोटी 30 लाख रुपये परदेशी भक्तांनी दान केले आहेत. काल सकाळपासून दान दिलेल्या रकमेची मोजदाद सुरु होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 03:12 PM IST

साईंच्या चरणी 4 कोटी रुपये दान

05 जुलै

शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात साईभक्तांनी तब्बल चार कोटी पंधरा लाख रुपये दान म्हणून दिले आहेत. गुरुपोर्णिमेला आपल्या गुरुला काहीतरी दान देण्याची हजारो वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. साईबाबांना गुरु मानणार्‍या भक्तांनी दानपेटीत 2 कोटी 62 लाख, डोनेशन काऊंटरवर 63 लाख रुपये, सोने 750 ग्रॅम, चांदी 5 किलो आणि याचबरोबर 31 देशांचे विदेशी चलन असे एकूण 4 कोटी 15 लाख रुपये तीन दिवसात दान केले आहेत. विशेष म्हणजे परदेशी चलनातील दानामध्ये यावर्षी मोठी वाढ झालेली आहे. गेल्या एका वर्षामध्ये तब्बल 4 कोटी 30 लाख रुपये परदेशी भक्तांनी दान केले आहेत. काल सकाळपासून दान दिलेल्या रकमेची मोजदाद सुरु होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close