S M L

अबू जुंदलच्या कोठडीत वाढ

05 जुलैमुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातला संशयित सुत्रधार अबू जुंदल याची कस्टडी मिळवण्यासाठी सध्या देशभरातल्या वेगवेगवळ्या तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे. पण जुंदलची कोठडी पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांना मिळालीय. दिल्ली पोलीस, राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए, मुंबई एटीएस आणि पुणे पोलीस या सर्वांनाच जुंदलची चौकशी करायची आहे. त्यासाठी दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात काही वेळापुर्वीच सुनावणी झाली. अबूची चौकशी पूर्ण व्हायचीय. त्यामुळे आणखी 15 दिवसांसाठी त्याचा ताबा मिळावा अशी विनंती दिल्ली पोलिसांनी कोर्टात केली. कोर्टाने दिल्ली पोलिसांना कारण विचारले असता, जाहीरपणे याचा खुलासा करता येणार नाही अशी बाजू पोलिसांनी मांडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कोर्टाबाहेर जाण्यास सांगण्यात आलं आणि सुनावणी पुन्हा सुरू झाली. अखेर अबूची कस्टडी दिल्ली पोलिसांनाच देण्यात आली. दरम्यान, मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब आणि अबू जुंदल यांची समोरासमोर चौकशी करायची आहे असं मुंबई एटीएसनं कोर्टाला सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 12:32 PM IST

अबू जुंदलच्या कोठडीत वाढ

05 जुलै

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातला संशयित सुत्रधार अबू जुंदल याची कस्टडी मिळवण्यासाठी सध्या देशभरातल्या वेगवेगवळ्या तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे. पण जुंदलची कोठडी पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांना मिळालीय. दिल्ली पोलीस, राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए, मुंबई एटीएस आणि पुणे पोलीस या सर्वांनाच जुंदलची चौकशी करायची आहे. त्यासाठी दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात काही वेळापुर्वीच सुनावणी झाली.

अबूची चौकशी पूर्ण व्हायचीय. त्यामुळे आणखी 15 दिवसांसाठी त्याचा ताबा मिळावा अशी विनंती दिल्ली पोलिसांनी कोर्टात केली. कोर्टाने दिल्ली पोलिसांना कारण विचारले असता, जाहीरपणे याचा खुलासा करता येणार नाही अशी बाजू पोलिसांनी मांडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कोर्टाबाहेर जाण्यास सांगण्यात आलं आणि सुनावणी पुन्हा सुरू झाली. अखेर अबूची कस्टडी दिल्ली पोलिसांनाच देण्यात आली. दरम्यान, मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब आणि अबू जुंदल यांची समोरासमोर चौकशी करायची आहे असं मुंबई एटीएसनं कोर्टाला सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close