S M L

मुंबई पोलिसांच्या स्पीड बोट खरेदीत घोटाळा

विनोद तळेकर, मुंबई06 जुलैमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी घेत मुंबई पोलिसांसाठीच्या स्पीड बोट खरेदी करण्यात आल्यात पण या खरेदीत घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या स्पीड बोटी खरेदी करण्यात आल्या त्या वाजवी किमतीपेक्षा अधिक दराने खरेदी केल्याचं माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झालंय. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस दलाचं सक्षमीकरणासाठी संरक्षण साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. यामध्ये सागरी गस्तीसाठी 12 स्पीड बोट्स मरीन फ्रंटीयर्स प्रा. ली. या कंपनीकडून 49 कोटी रूपयांना घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पण राज्य गुप्तवार्ता विभागाने राबवलेली ही खरेदी प्रक्रीया सदोष असून या कंपनीने दिलेले दर हे जास्त असल्याचं म्हणत राज्य 20 शासनाने पुन्हा निविदा काढण्याचे आदेश दिले. तरीही या आदेशांना केराची टोपली दाखवत गुप्तवार्ता विभागानं याच कंपनीला कंत्राट दिलं. विशेष म्हणजे ही कंपनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल पाटील यांची आहे.स्पीड बोटची खरेदी वादात31 मार्च 2009: निविदा प्रक्रीयेत त्रुटी असल्याचं सांगत गृह विभागाने नव्याने निविदा काढण्याचे आदेश25 जून 2009: गृह खात्याचेच जुन्याच कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेशखरं तर पहिल्याच निविदा प्रक्रीयेच्या वेळी दुबई आणि अमेरिकेतल्या दोन कंपन्यांनी यापेक्षा कमी दरात बोटी देण्याची तयारी दाखवली होती. तसेच ऑर्डर मिळाल्यास मेंटेनन्स साठी सर्व्हिस स्टेशन उभारण्याची तयारी दाखवली होती. तरीही त्यांना डावलून मरीन फ्रंटीयर्सला कंत्राट देण्यामागे नेमकं काय कारण होतं असा प्रश्न निर्माण होतोच.आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर तीन महिन्याच्या आत या बोटी पोलीस दलाला मिळणं अपेक्षित होतं. पण तब्बल दोन वर्षानंतर त्या पोलीस दलाला मिळाल्या. त्यामुळे या बोटींची खरेदी घाईघाईत आणि वाढीव दराने का केली असा प्रश्न निर्माण होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2012 09:38 AM IST

मुंबई पोलिसांच्या स्पीड बोट खरेदीत घोटाळा

विनोद तळेकर, मुंबई

06 जुलै

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी घेत मुंबई पोलिसांसाठीच्या स्पीड बोट खरेदी करण्यात आल्यात पण या खरेदीत घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या स्पीड बोटी खरेदी करण्यात आल्या त्या वाजवी किमतीपेक्षा अधिक दराने खरेदी केल्याचं माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झालंय.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस दलाचं सक्षमीकरणासाठी संरक्षण साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. यामध्ये सागरी गस्तीसाठी 12 स्पीड बोट्स मरीन फ्रंटीयर्स प्रा. ली. या कंपनीकडून 49 कोटी रूपयांना घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पण राज्य गुप्तवार्ता विभागाने राबवलेली ही खरेदी प्रक्रीया सदोष असून या कंपनीने दिलेले दर हे जास्त असल्याचं म्हणत राज्य 20 शासनाने पुन्हा निविदा काढण्याचे आदेश दिले. तरीही या आदेशांना केराची टोपली दाखवत गुप्तवार्ता विभागानं याच कंपनीला कंत्राट दिलं. विशेष म्हणजे ही कंपनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल पाटील यांची आहे.

स्पीड बोटची खरेदी वादात

31 मार्च 2009: निविदा प्रक्रीयेत त्रुटी असल्याचं सांगत गृह विभागाने नव्याने निविदा काढण्याचे आदेश25 जून 2009: गृह खात्याचेच जुन्याच कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश

खरं तर पहिल्याच निविदा प्रक्रीयेच्या वेळी दुबई आणि अमेरिकेतल्या दोन कंपन्यांनी यापेक्षा कमी दरात बोटी देण्याची तयारी दाखवली होती. तसेच ऑर्डर मिळाल्यास मेंटेनन्स साठी सर्व्हिस स्टेशन उभारण्याची तयारी दाखवली होती. तरीही त्यांना डावलून मरीन फ्रंटीयर्सला कंत्राट देण्यामागे नेमकं काय कारण होतं असा प्रश्न निर्माण होतोच.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर तीन महिन्याच्या आत या बोटी पोलीस दलाला मिळणं अपेक्षित होतं. पण तब्बल दोन वर्षानंतर त्या पोलीस दलाला मिळाल्या. त्यामुळे या बोटींची खरेदी घाईघाईत आणि वाढीव दराने का केली असा प्रश्न निर्माण होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2012 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close