S M L

विधानपरिषदेच्या जागेसाठी दिल्ली दरबारी लॉबिंग

05 जुलै25 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी चार जागांवर काँग्रेस खासदार निवृत्त झालेत. या जागांसाठी तिकीट मिळावे म्हणून काँग्रेस नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग सुरू केलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उल्हासदादा पवार, एस. क्यू. जामा आणि राजन तेली निवृत्त झालेत. यापैकी माणिकराव ठाकरे यांना पुन्हा तिकीट मिळाणार हे जवळपास निश्चित झालंय. उरलेल्या 3 जागांसाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत. उल्हासदादा पवार यांनी दिल्लीत जाऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते विलासराव देशमुख गटाचे म्हणून ओळखळे जातात. त्यामुळे विलासराव गटाला 3 पैकी 1 जागा नक्की द्यावी लागेल अशी चिन्हं आहेत. एस. क्यू जामा हे अल्पसंख्याक कोट्यातले आहेत. त्यामुळे ही जागी अल्पसंख्याक उमेदवारालाच द्यावा लागेल, असं काहींचं म्हणणंय. या जागेसाठी माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, भंडार्‍यातले नेते झिया पटेल आणि इतर काही जण इच्छुक आहेत. राजन तेली हे राणे गटातले आहेत. त्यामुळे या जागेसाठी एक जागा राणे गटातलेलाही द्यावी लागेल, असं म्हटलं जातंय. ठाण्यातील नेते रविंद्र फाटक यांचं नाव राणे सुचवतील अशी चर्चा आहे. शिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेले संजय दत्त यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांवर आहे. पण मुख्यमंत्री दत्त यांना संधी देणार की एमपीसीसी मधले त्यांचे ठाम समर्थक महादेव शेलार यांना संधी देणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. यासगळ्यांसोबतच जनार्दन चांदुरकर, चंद्रकांत छाजेड यांनीचंही दिल्लीत लॉबिंग सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 12:54 PM IST

विधानपरिषदेच्या जागेसाठी दिल्ली दरबारी लॉबिंग

05 जुलै25 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी चार जागांवर काँग्रेस खासदार निवृत्त झालेत. या जागांसाठी तिकीट मिळावे म्हणून काँग्रेस नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग सुरू केलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उल्हासदादा पवार, एस. क्यू. जामा आणि राजन तेली निवृत्त झालेत. यापैकी माणिकराव ठाकरे यांना पुन्हा तिकीट मिळाणार हे जवळपास निश्चित झालंय. उरलेल्या 3 जागांसाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत.

उल्हासदादा पवार यांनी दिल्लीत जाऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते विलासराव देशमुख गटाचे म्हणून ओळखळे जातात. त्यामुळे विलासराव गटाला 3 पैकी 1 जागा नक्की द्यावी लागेल अशी चिन्हं आहेत. एस. क्यू जामा हे अल्पसंख्याक कोट्यातले आहेत. त्यामुळे ही जागी अल्पसंख्याक उमेदवारालाच द्यावा लागेल, असं काहींचं म्हणणंय. या जागेसाठी माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, भंडार्‍यातले नेते झिया पटेल आणि इतर काही जण इच्छुक आहेत.

राजन तेली हे राणे गटातले आहेत. त्यामुळे या जागेसाठी एक जागा राणे गटातलेलाही द्यावी लागेल, असं म्हटलं जातंय. ठाण्यातील नेते रविंद्र फाटक यांचं नाव राणे सुचवतील अशी चर्चा आहे. शिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेले संजय दत्त यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांवर आहे. पण मुख्यमंत्री दत्त यांना संधी देणार की एमपीसीसी मधले त्यांचे ठाम समर्थक महादेव शेलार यांना संधी देणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. यासगळ्यांसोबतच जनार्दन चांदुरकर, चंद्रकांत छाजेड यांनीचंही दिल्लीत लॉबिंग सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close