S M L

चव्हाणांसाठी समर्थकांची फिल्डिंग

09 जुलैआदर्श प्रकरणात दिवसेंदिवस अडचणीत येत असलेल्या अशोक चव्हाण यांना बाहेर काढण्यासाठी आता त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे.पक्षानं पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी समर्थक आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिलंय. त्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष बैठकीतअशोक चव्हाण समर्थक आमदारांनी अशोक चव्हाण एकाकी पडल्याचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. समर्थकांनी अशोक चव्हाणांचा मुद्दा मांडला. त्यांच्या नाराजीचा दखल घेत काँग्रेस पक्ष हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिशी असल्याची हमी आज झालेल्या विधिमंडळ पक्ष बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. एकीकडे राष्ट्रवादी सारखा आपला मित्र पक्ष अटक झालेल्या त्यांच्या मंत्र्यांच्या पाठिशीही मंत्रीपदाचा राजीनामा न मागता ठामपणे उभा राहतो पण आपल्या पक्षात मात्र नुसत्या आरोपांमुळे राजीनामा घेतला जातो.असा तीव्र आक्षेप समर्थकांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसमोर मांडला. अशोक चव्हाणांच्या समर्थकांचा फौजफाटा- काँग्रेसचे 16 तालुका अध्यक्ष - पंचायत समितीचे 9 सभापती- 23 जिल्हा परिषद सदस्य -61 नगरसेवक- नांदेड जिल्ह्यातील 4 आमदारांसह इतर 4 समर्थक आमदार

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2012 11:02 AM IST

चव्हाणांसाठी समर्थकांची फिल्डिंग

09 जुलै

आदर्श प्रकरणात दिवसेंदिवस अडचणीत येत असलेल्या अशोक चव्हाण यांना बाहेर काढण्यासाठी आता त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे.पक्षानं पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी समर्थक आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिलंय. त्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष बैठकीतअशोक चव्हाण समर्थक आमदारांनी अशोक चव्हाण एकाकी पडल्याचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला. समर्थकांनी अशोक चव्हाणांचा मुद्दा मांडला. त्यांच्या नाराजीचा दखल घेत काँग्रेस पक्ष हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिशी असल्याची हमी आज झालेल्या विधिमंडळ पक्ष बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. एकीकडे राष्ट्रवादी सारखा आपला मित्र पक्ष अटक झालेल्या त्यांच्या मंत्र्यांच्या पाठिशीही मंत्रीपदाचा राजीनामा न मागता ठामपणे उभा राहतो पण आपल्या पक्षात मात्र नुसत्या आरोपांमुळे राजीनामा घेतला जातो.असा तीव्र आक्षेप समर्थकांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसमोर मांडला.

अशोक चव्हाणांच्या समर्थकांचा फौजफाटा

- काँग्रेसचे 16 तालुका अध्यक्ष - पंचायत समितीचे 9 सभापती- 23 जिल्हा परिषद सदस्य

-61 नगरसेवक- नांदेड जिल्ह्यातील 4 आमदारांसह इतर 4 समर्थक आमदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2012 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close