S M L

'मुख्यमंत्री, भुजबळांवर गुन्हे दाखल करा'

10 जुलैमहाराष्ट्राचा कारभाराचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयाला मागिल महिन्यात भीषण आग लागून तीन मजले राख झाले. या अपघातात 5 लोकांचा मृत्यू झाला. पण एवढी मोठी घटना घडून सुध्दा कोणतीही कायदेशीर कारवाई अजून झाली नाही. काल सोमवारी विरोधकांनी आगीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरत अधिवेशनाचे कामकाज बंद पाडलं. आज मंगळावारी विरोधक आक्रमक होतं मंत्रालयाच्या आगीप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.तर मंत्रालयाला लागलेल्या आगीचा अहवाल मुद्दाम दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलाय. मंत्रालयाच्या आगीवर चर्चा करणार्‍या विरोधकांच्या दबावानंतर सरकार आज या विषयावर चर्चा करायला तयार झालंय. आणि यावरुन सरकारला विरोधकांनी सरकारवर एकच हल्लाबोल केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2012 09:21 AM IST

'मुख्यमंत्री, भुजबळांवर गुन्हे दाखल करा'

10 जुलै

महाराष्ट्राचा कारभाराचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयाला मागिल महिन्यात भीषण आग लागून तीन मजले राख झाले. या अपघातात 5 लोकांचा मृत्यू झाला. पण एवढी मोठी घटना घडून सुध्दा कोणतीही कायदेशीर कारवाई अजून झाली नाही. काल सोमवारी विरोधकांनी आगीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरत अधिवेशनाचे कामकाज बंद पाडलं. आज मंगळावारी विरोधक आक्रमक होतं मंत्रालयाच्या आगीप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.तर मंत्रालयाला लागलेल्या आगीचा अहवाल मुद्दाम दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलाय. मंत्रालयाच्या आगीवर चर्चा करणार्‍या विरोधकांच्या दबावानंतर सरकार आज या विषयावर चर्चा करायला तयार झालंय. आणि यावरुन सरकारला विरोधकांनी सरकारवर एकच हल्लाबोल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 09:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close