S M L

अभिनेत्री पायल रोहतगी मागते ब्लॅक मनी

10 जुलैबिग बॉसमध्ये जलवा दाखवणारी पायल रोहतगीसुद्धा फिल्ममधल्या रोलसाठी थेट ब्लॅक मनीची मागणी करतेय. पायल रोहतगी या अभिनेत्रीनं 'कॉर्पोरेट', 'हे बेबी', आणि '36 चायना टाऊन' यासारख्या सिनेमातून काम केलंय. बिग बॉसमुळे ती प्रामुख्यानं प्रकाशझोतात आली. कोब्रापोस्टचा अंडरकव्हर रिपोर्टर एक फायनान्सर म्हणून पायलला भेटला. काही महत्त्वाच्या अभिनेत्यांसोबत काम करण्यासाठी म्हणून तिच्याशी करार करण्याबाबत चर्चा केली. पैशांबाबत चर्चा सुरु होताच पायलनं आपल्याला ब्लॅकमनीच द्यावेत असा आग्रह धरला. रिपोर्टर - आपण 30 लाख रुपयांबद्दल बोललो पण हे पैसे कशा स्वरुपात हवेत ? ब्लॅकमनी किती द्यायचा ?पायल - मला चेकनं फक्त 5 लाख हवेतरिपोर्टर - म्हणजे 5 लाख चेकनं आणि 25 लाख कॅशनं ?रिपोर्टर - पण काल रात्री तू म्हटल्याप्रमाणे 25 टक्क्यांबाबत काय ?पायल - नाही, 25 लाख कॅश आणि 5 लाख चेकनं संग्राम आणि पायल यांना प्रत्येकी 30 लाख रुपये हवेत. पण कागदोपत्री हवेत फक्त 5 लाख..ब्लॅकमध्ये पैसे घेणं हे बॉलिवूडसाठी नवं नाही.जे पायलच्या घरी घटलं तेच अभिनेत्री आरती छाब्रियाच्या घरीही पाहायला मिळालं. शूट आऊट ऍट लोखंडवाला, पार्टनर, शादी नंबर 1 यासारख्या काही सिनेमात तिनं काम केलंय. आमच्या अंडरकव्हर रिपोर्टरनं सिनेमात तिला रोलची ऑफर दिली तेव्हा तिनं तिचे वडील डॉ अशोक आणि सुनीता छाब्रिया यांच्याशी बोलायला सांगितलं.सुनीता- साधारणपणे आम्ही आरतीचे पैसे हे अर्धे ब्लॅक आणि अर्धे व्हाईट घेतो. रिपोर्टर - ब्लॅकमध्ये अधिकचे पैसे हवे आहेत का?सुनीता - ठीक आहे. आपण 60 - 40 या प्रमाणात घेऊयातएवढंच नाही तर छाब्रिया यांनी ब्लॅक मनी आणि कॅश कशी द्यायची याबाबतही सांगितलं. डॉ. अशोक छाब्रिया - जो करार असेल तो व्हाईट असेलरिपोर्टर - मग ब्लॅक मनीचं काय? त्याची गॅरंटी काय?डॉ अशोक छाब्रिया- हे तात्पुरतं करारपत्र असेल. एकदा पैसे मिळाले आणि काम पूर्ण होईल तेव्हा ते करारपत्र फाडडून टाकू...रिपोर्टर - फाडून टाकायचं? ठीक आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे पण फायद्याचं आहे. यात पूर्णपणे काळा पैसा वापरला जातो. ज्याची कसलीही मोजदात नसते...याच काळ्यापैशावर बॉलिवूडचा धंदा सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2012 05:50 PM IST

अभिनेत्री पायल रोहतगी मागते ब्लॅक मनी

10 जुलै

बिग बॉसमध्ये जलवा दाखवणारी पायल रोहतगीसुद्धा फिल्ममधल्या रोलसाठी थेट ब्लॅक मनीची मागणी करतेय. पायल रोहतगी या अभिनेत्रीनं 'कॉर्पोरेट', 'हे बेबी', आणि '36 चायना टाऊन' यासारख्या सिनेमातून काम केलंय. बिग बॉसमुळे ती प्रामुख्यानं प्रकाशझोतात आली. कोब्रापोस्टचा अंडरकव्हर रिपोर्टर एक फायनान्सर म्हणून पायलला भेटला. काही महत्त्वाच्या अभिनेत्यांसोबत काम करण्यासाठी म्हणून तिच्याशी करार करण्याबाबत चर्चा केली. पैशांबाबत चर्चा सुरु होताच पायलनं आपल्याला ब्लॅकमनीच द्यावेत असा आग्रह धरला.

रिपोर्टर - आपण 30 लाख रुपयांबद्दल बोललो पण हे पैसे कशा स्वरुपात हवेत ? ब्लॅकमनी किती द्यायचा ?पायल - मला चेकनं फक्त 5 लाख हवेतरिपोर्टर - म्हणजे 5 लाख चेकनं आणि 25 लाख कॅशनं ?रिपोर्टर - पण काल रात्री तू म्हटल्याप्रमाणे 25 टक्क्यांबाबत काय ?पायल - नाही, 25 लाख कॅश आणि 5 लाख चेकनं

संग्राम आणि पायल यांना प्रत्येकी 30 लाख रुपये हवेत. पण कागदोपत्री हवेत फक्त 5 लाख..ब्लॅकमध्ये पैसे घेणं हे बॉलिवूडसाठी नवं नाही.जे पायलच्या घरी घटलं तेच अभिनेत्री आरती छाब्रियाच्या घरीही पाहायला मिळालं. शूट आऊट ऍट लोखंडवाला, पार्टनर, शादी नंबर 1 यासारख्या काही सिनेमात तिनं काम केलंय. आमच्या अंडरकव्हर रिपोर्टरनं सिनेमात तिला रोलची ऑफर दिली तेव्हा तिनं तिचे वडील डॉ अशोक आणि सुनीता छाब्रिया यांच्याशी बोलायला सांगितलं.

सुनीता- साधारणपणे आम्ही आरतीचे पैसे हे अर्धे ब्लॅक आणि अर्धे व्हाईट घेतो. रिपोर्टर - ब्लॅकमध्ये अधिकचे पैसे हवे आहेत का?सुनीता - ठीक आहे. आपण 60 - 40 या प्रमाणात घेऊयात

एवढंच नाही तर छाब्रिया यांनी ब्लॅक मनी आणि कॅश कशी द्यायची याबाबतही सांगितलं.

डॉ. अशोक छाब्रिया - जो करार असेल तो व्हाईट असेलरिपोर्टर - मग ब्लॅक मनीचं काय? त्याची गॅरंटी काय?डॉ अशोक छाब्रिया- हे तात्पुरतं करारपत्र असेल. एकदा पैसे मिळाले आणि काम पूर्ण होईल तेव्हा ते करारपत्र फाडडून टाकू...रिपोर्टर - फाडून टाकायचं? ठीक आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे पण फायद्याचं आहे. यात पूर्णपणे काळा पैसा वापरला जातो. ज्याची कसलीही मोजदात नसते...याच काळ्यापैशावर बॉलिवूडचा धंदा सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close