S M L

जगदीश शेट्टर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

10 जुलैकर्नाटकातला राजकीय पेचप्रसंग अखेर सुटला आहे. विद्यमान मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी अखेर राजीनामा देण्याचं मान्य केलंय. त्यामुळे जगदीश शेट्टर यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या सगळ्या नेतृत्त्वबदलाच्या नाट्यामुळे कर्नाटकाला एका वर्षात तीन मुख्यमंत्री मिळाले. पण राजीनामा देण्यापूर्वी सदानंद गौडा यांनी पक्षश्रेष्ठींसमोर काही अटी ठेवल्यात. त्यामुळे कर्नाटकला दोन उपमुख्यमंत्री मिळतील, अशी शक्यता आहे. प्रामुख्यानं त्यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद आणि त्यांच्या समर्थकांना उपमुख्यमंत्रीपद अशा दोन महत्त्वाच्या अटी आहेत. त्यावर पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक प्रतिसाद दाखवल्यामुळं सदानंद गौडा राजीनामा देण्यास राजी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2012 05:59 PM IST

जगदीश शेट्टर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

10 जुलै

कर्नाटकातला राजकीय पेचप्रसंग अखेर सुटला आहे. विद्यमान मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी अखेर राजीनामा देण्याचं मान्य केलंय. त्यामुळे जगदीश शेट्टर यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या सगळ्या नेतृत्त्वबदलाच्या नाट्यामुळे कर्नाटकाला एका वर्षात तीन मुख्यमंत्री मिळाले. पण राजीनामा देण्यापूर्वी सदानंद गौडा यांनी पक्षश्रेष्ठींसमोर काही अटी ठेवल्यात. त्यामुळे कर्नाटकला दोन उपमुख्यमंत्री मिळतील, अशी शक्यता आहे. प्रामुख्यानं त्यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद आणि त्यांच्या समर्थकांना उपमुख्यमंत्रीपद अशा दोन महत्त्वाच्या अटी आहेत. त्यावर पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक प्रतिसाद दाखवल्यामुळं सदानंद गौडा राजीनामा देण्यास राजी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close