S M L

स्वस्त धान्य योजनेपासूनही भटके विमुक्त वंचित

26 नोव्हेंबर, मुंबईगोविंद तुपेभटक्या विमुक्तांना बीपीएल कार्ड देऊन स्वस्त दरात रेशन देण्याची योजना सरकारनं जाहिर केली. मात्र इतर बीपीएल धारकांना धान्य मिळाल्यानंतर उरलं तर भटक्या विमुक्ताना दिलं जाईल असं योजनेत म्हटलंय. त्यामुळे या स्वस्त धान्य योजनेतही भटके विमुक्त योजनेबाहेरच राहतील अशी व्यवस्था केल्याचा आरोप होतोय.नाना पवारांचं कुटुंब मूळचं उस्मानाबादच्या कळंबचं. हे पारधी समाजाचं कुटुंब फुलांचे गजरे करत मुंबईतल्या लोअर परेलच्या फूटपाथवर पोट भरतंय. दिवसाची कमाई शंभर ते दीडशे रूपये अशा भटक्या कुटुंबाना स्वस्त दरात धान्य मिळावं म्हणून सरकारनं एक जी आर काढलाय, याची त्यांना माहितीही नाही. अशी अनेक कुटुंब आज आपल्याला मुंबईत पहायला मिळतील.महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या बेरड, बेस्तर, लमानी, पासेपारधी, वडर, वागरी यासारख्या एकूण बेच्याळीस जमाती आहेत..या जमातींची एकूण देशातील लोकसंख्या जवळपास बारा कोटी असून त्यापैकी दीड कोटी ही महाराष्ट्रात आहे. 1952 साली या जमातीचा नावापुढील गुन्हेगार हा शब्द फक्त काढला गेला. पण गावकुसाबाहेरच्या भटक्यांना कुणी गावात घेतलं नाही. भटक्या विमुक्तांच्या कार्यकर्त्याच्या रेट्यामुळं बीपीएलचं स्वस्त धान्य द्यायला सरकार तयार झालं. बीपीएलचा धान्याचा कोटा वाढवला नाही. सरकारी जीआर म्हणतो 'भटक्यांना मिळणारं बीपीएल कार्ड तात्पुरत्या स्वरुपाचं असेल. बी पी एल च्या धान्याच्या सध्याच्या कोट्यातून शिल्लक राहिल्यास भटक्यांना धान्य मिळेल. भविष्यात बी. पी. एल धान्याचा खप वाढल्यास भटक्यांना मिळणारं धान्य तात्काळ बंद करण्यात येईल. या सर्व अटी मला मंजूर आहेत असं भटक्यांकडून लिहून घेतलं जाणार आहे. या जाचक अटींमुळेच कागदावरील ही योजना प्रत्यक्षात किती फायद्याची ठरणार, असा प्रश्न विचारला जात आहे. "गोरगरीबांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न आहे" असा आरोप रेशनिंग कृती समितीचे कार्यकर्ते संदीप सुमन यांनी केला आहे.सरकारला मात्र आपण केलेलं काम योग्य वाटतंय. "केंद्र सरकारच्या नियमानुसार आम्ही थेट धान्य देऊ शकत नाहीय त्यातून आम्ही असा शासकीय तोडगा काढला. धान्य कमी पडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. जर हे वाक्य वगळलं तर देतोय तेवढीही सवलत आम्हाला देता येणार नाही" असं अन्न नागरी पुरवठा मंत्री सुनील तटकारे यांनी सांगितलं टू व्हिलर आणि घरात कुकिंग गॅस असला तरीही बीपीएलचं कार्ड भटक्यांना मिळेल अशी सोय आहे. मात्र प्रत्यक्षात भटके योजनेच्या रिघाबाहेरच राहतील अशी सोय केल्याचं चित्र यानिमित्तानं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 01:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close