S M L

पिंपरी चिंचवडमध्ये 25 अनधिकृत इमारती जमिनदोस्त

11 जुलैसध्या पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु आहे. ह्या कारवाईअंतर्गत शहरातील अनधिकृत अशा तब्बल 25 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या आहेत. पण शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे गटनेते आप्पा बारणे यांनी पालिकेची मुख्य इमारतच बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचा आरोप केलाय. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या या मुख्य इमारतीसह महापालिकेच्या हद्दीतल्या तब्बल 650 पैकी केवळ 11 कार्यालयांच्या इमारतींनाच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त असल्याची बाबही बारणे यांनी निदर्शनास आणून दिली. म्हणजेच महापालिकेच्या 650 पैकी 539 कार्यालयेच अनधिकृत असल्याचं लक्षात येतंय. इतकंच नव्हे तर पालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर आरक्षित असलेल्या जागेवर देखील 25,000 अतिक्रमणे झाली असल्याची माहितीही बारणे यांनी उघड केलीय. बारणे यांनी ही सगळी माहिती माहितीच्या अधिकारातून मिळवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2012 02:52 PM IST

11 जुलै

सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु आहे. ह्या कारवाईअंतर्गत शहरातील अनधिकृत अशा तब्बल 25 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या आहेत. पण शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे गटनेते आप्पा बारणे यांनी पालिकेची मुख्य इमारतच बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचा आरोप केलाय. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या या मुख्य इमारतीसह महापालिकेच्या हद्दीतल्या तब्बल 650 पैकी केवळ 11 कार्यालयांच्या इमारतींनाच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त असल्याची बाबही बारणे यांनी निदर्शनास आणून दिली. म्हणजेच महापालिकेच्या 650 पैकी 539 कार्यालयेच अनधिकृत असल्याचं लक्षात येतंय. इतकंच नव्हे तर पालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर आरक्षित असलेल्या जागेवर देखील 25,000 अतिक्रमणे झाली असल्याची माहितीही बारणे यांनी उघड केलीय. बारणे यांनी ही सगळी माहिती माहितीच्या अधिकारातून मिळवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2012 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close