S M L

मेरिकॉमचं 'गोल्डन ड्रीम'

12 जुलै5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली मेरिकॉमही लंडन ऑलिम्पिकसाठी सज्ज झाली आहे. भारतीय बॉक्सिंग टीममधली ती एकमेव महिला बॉक्सर आहे. ऑलिम्पिकमध्ये यंदा पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा समावेश झाला आहे. आणि पहिलं वहिलं गोल्ड मेडल नावावर करण्याचा निर्धार मेरिकॉमनं केला आहे. ती दिसायला जरी शांत आणि मवाळ वाटत असली तरी तिच्या पंचमध्ये कमालीची ताकद आहे. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा तिनं पराक्रम केला. आणि भारतीय महिला बॉक्सिंगची ती प्रेरणास्थान आहे.मेरी कॉम म्हणते,मला आता लोक ओळखतात... पण मी इतकी लोकप्रिय नाही.. इतरांना जितकी लोकप्रियता मिळते तितकी मला मिळत नाही. पण जेव्हा मी ऑलिम्पिक मेडल जिंकेन तेव्हा मला तो मान मिळेल हे नक्की.मेरी ही फक्त मणिपूरचीच नाही तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडू म्हणून आतापर्यंत तीनं यशस्वी कामगिरी केलीय. पण अजूनही एक गोष्ट बाकी आहे. यावर मेरी कॉम म्हणते, माझ्याकडे सगळं काही आहे. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियनचा किताब, सरकारचे ऍवॉर्ड्स, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री सगळं... पण नाहीये ते ऑलिम्पिक पदकं... आपल्या देशात वर्ल्ड चॅम्पियन होणं हे किती कठीण असतं हे लोकांना कळत नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावण्याचं माझं स्वप्न आहे. आणि या स्वप्नासाठी मेरी सध्या कसून तयारी करतेय. तिला मदत करण्यासाठी तिची टीमसुद्धा सज्ज झाली. माझे अनेक प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा उंच आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा उंच आणि बुटक्या अशा दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध कसा खेळ करायचा याचा मी अभ्यास करतेय मला पूर्ण तयारीनीशी उतरायचंय असं मेरी कॉम म्हणते.यावर्षी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा समावेश केला गेला. मेरीला आता 51 किलो वजनी गटात खेळावं लागणार आहे. त्यामुळे हे एक नवीन आव्हान तिच्यासमोर उभं ठाकलयं. लंडनमध्ये महिला बॉक्सिंगमध्ये फक्त 12 प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे मेडल पटकावण्यासाठी मेरीला फक्त 2 बाऊट्स जिंकायच्यात.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 04:17 PM IST

मेरिकॉमचं 'गोल्डन ड्रीम'

12 जुलै

5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली मेरिकॉमही लंडन ऑलिम्पिकसाठी सज्ज झाली आहे. भारतीय बॉक्सिंग टीममधली ती एकमेव महिला बॉक्सर आहे. ऑलिम्पिकमध्ये यंदा पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा समावेश झाला आहे. आणि पहिलं वहिलं गोल्ड मेडल नावावर करण्याचा निर्धार मेरिकॉमनं केला आहे.

ती दिसायला जरी शांत आणि मवाळ वाटत असली तरी तिच्या पंचमध्ये कमालीची ताकद आहे. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा तिनं पराक्रम केला. आणि भारतीय महिला बॉक्सिंगची ती प्रेरणास्थान आहे.

मेरी कॉम म्हणते,मला आता लोक ओळखतात... पण मी इतकी लोकप्रिय नाही.. इतरांना जितकी लोकप्रियता मिळते तितकी मला मिळत नाही. पण जेव्हा मी ऑलिम्पिक मेडल जिंकेन तेव्हा मला तो मान मिळेल हे नक्की.

मेरी ही फक्त मणिपूरचीच नाही तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडू म्हणून आतापर्यंत तीनं यशस्वी कामगिरी केलीय. पण अजूनही एक गोष्ट बाकी आहे.

यावर मेरी कॉम म्हणते, माझ्याकडे सगळं काही आहे. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियनचा किताब, सरकारचे ऍवॉर्ड्स, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री सगळं... पण नाहीये ते ऑलिम्पिक पदकं... आपल्या देशात वर्ल्ड चॅम्पियन होणं हे किती कठीण असतं हे लोकांना कळत नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावण्याचं माझं स्वप्न आहे. आणि या स्वप्नासाठी मेरी सध्या कसून तयारी करतेय. तिला मदत करण्यासाठी तिची टीमसुद्धा सज्ज झाली.

माझे अनेक प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा उंच आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा उंच आणि बुटक्या अशा दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध कसा खेळ करायचा याचा मी अभ्यास करतेय मला पूर्ण तयारीनीशी उतरायचंय असं मेरी कॉम म्हणते.

यावर्षी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा समावेश केला गेला. मेरीला आता 51 किलो वजनी गटात खेळावं लागणार आहे. त्यामुळे हे एक नवीन आव्हान तिच्यासमोर उभं ठाकलयं. लंडनमध्ये महिला बॉक्सिंगमध्ये फक्त 12 प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे मेडल पटकावण्यासाठी मेरीला फक्त 2 बाऊट्स जिंकायच्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close