S M L

कलमाडींना ऑलिम्पिक शिष्टमंडळातून वगळले

13 जुलैकॉमनवेल्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला जाण्यासाठी पटियाला हाऊस कोर्टाने परवानगी दिलीये पण आता क्रीडा मंत्री अजय माकन यांनी कलमाडींवर टीका केली आहे. भ्रष्टाचाराचा ठपका, सीबीआयची चौकशी सुरु असताना जेलमध्ये गेलेली व्यक्ती ही भारतीय शिष्टमंडळाचा भाग असू शकत नाही असं क्रीडा मंत्री माकन यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर कलमाडींना लंडन ऑलिम्पिकसाठी कोणी निमंत्रित केलंय याचा आम्ही पाठपुरावा करु आणि गरज पडल्यास त्यांना ज्यांनी निमंत्रित केलं त्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा करु असं माकन यांनी स्पष्ट केलं.पुण्याचे खासदार कलमाडी हे ऐथलिटित संघटनेचे विद्यमान अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी ऑलिम्पिकचे निमंत्रण मिळाले. पण कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी सुरु असल्यामुळे त्यांना परदेशात जाता येत नाही. यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला. आज कोर्टाने लंडन ऑलिम्पिकसाठी जाण्यास परवानगी दिली आहे. आता 26 जुलैला ते ऑलिम्पिकसाठी लंडनला जाणार आहे. परंतु क्रीडामंत्र्यांनी शिष्टमंडळातून बाहेर काढल्यामुळे कलमाडींनी एकट्याने जावे असा मार्ग करुन दिला आहे. पण त्याचबरोबर निमंत्रण पाठवणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करणार आहे. त्यामुळे कलमाडींच्या लंडनवारीवर आता टांगती तलवार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2012 12:29 PM IST

कलमाडींना ऑलिम्पिक शिष्टमंडळातून वगळले

13 जुलै

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला जाण्यासाठी पटियाला हाऊस कोर्टाने परवानगी दिलीये पण आता क्रीडा मंत्री अजय माकन यांनी कलमाडींवर टीका केली आहे. भ्रष्टाचाराचा ठपका, सीबीआयची चौकशी सुरु असताना जेलमध्ये गेलेली व्यक्ती ही भारतीय शिष्टमंडळाचा भाग असू शकत नाही असं क्रीडा मंत्री माकन यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर कलमाडींना लंडन ऑलिम्पिकसाठी कोणी निमंत्रित केलंय याचा आम्ही पाठपुरावा करु आणि गरज पडल्यास त्यांना ज्यांनी निमंत्रित केलं त्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा करु असं माकन यांनी स्पष्ट केलं.

पुण्याचे खासदार कलमाडी हे ऐथलिटित संघटनेचे विद्यमान अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी ऑलिम्पिकचे निमंत्रण मिळाले. पण कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी सुरु असल्यामुळे त्यांना परदेशात जाता येत नाही. यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज दाखल केला. आज कोर्टाने लंडन ऑलिम्पिकसाठी जाण्यास परवानगी दिली आहे. आता 26 जुलैला ते ऑलिम्पिकसाठी लंडनला जाणार आहे. परंतु क्रीडामंत्र्यांनी शिष्टमंडळातून बाहेर काढल्यामुळे कलमाडींनी एकट्याने जावे असा मार्ग करुन दिला आहे. पण त्याचबरोबर निमंत्रण पाठवणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करणार आहे. त्यामुळे कलमाडींच्या लंडनवारीवर आता टांगती तलवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2012 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close