S M L

नेपाळमध्ये बस अपघातात 36 ठार

15 जुलैनेपाळमध्ये तिर्थयात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंवर काळाने झडप घातली आहे. 60 यात्रेकरुंना घेऊन निघालेली बस गंडक कॅनॉलमध्ये कोसळून 36 जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता आहे. या बसमध्ये बहुतांश यात्रेकरु हे भारतीय आहे. आज सकाळी 60 यात्रेकरुंना घेऊन ही बस नवळप्राशी त्रिवेणीघाट मंदिराकडे जात होती. गंडक कॅनॉलजवळ पोहचली. सतत होत असलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता त्यामुळे बसचालकाचा ताबा सुटल्यामुळे बस कॅनॉलमध्ये कोसळली. यातील बहुतांश यात्रेकरु हे बिहार आणि उत्तरप्रदेश येथील आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु असून पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झालाय. आतापर्यंत 25 पुरुष,10 महिला आणि एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले आहे. जखमींना स्थानिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. पण मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता प्रशासानाने वर्तवली आहे. काठमांडू येथील भारतीय दुतावासाकडून बस अपघाता संबंधीत माहितीसाठी +97714412135 हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2012 02:42 PM IST

नेपाळमध्ये बस अपघातात 36 ठार

15 जुलैनेपाळमध्ये तिर्थयात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंवर काळाने झडप घातली आहे. 60 यात्रेकरुंना घेऊन निघालेली बस गंडक कॅनॉलमध्ये कोसळून 36 जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता आहे. या बसमध्ये बहुतांश यात्रेकरु हे भारतीय आहे. आज सकाळी 60 यात्रेकरुंना घेऊन ही बस नवळप्राशी त्रिवेणीघाट मंदिराकडे जात होती. गंडक कॅनॉलजवळ पोहचली. सतत होत असलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता त्यामुळे बसचालकाचा ताबा सुटल्यामुळे बस कॅनॉलमध्ये कोसळली. यातील बहुतांश यात्रेकरु हे बिहार आणि उत्तरप्रदेश येथील आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु असून पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झालाय. आतापर्यंत 25 पुरुष,10 महिला आणि एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले आहे. जखमींना स्थानिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. पण मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता प्रशासानाने वर्तवली आहे. काठमांडू येथील भारतीय दुतावासाकडून बस अपघाता संबंधीत माहितीसाठी 97714412135 हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2012 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close