S M L

अखेर उद्यापासून गुटखाबंदी

19 जुलैअखेर राज्यात उद्यापासून गुटखाबंदी लागू होणार आहे. गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही बंदी गुटखा आणि पानमसाल्याचं उत्पादन, विक्री आणि साठा यावर घालण्यात आलीय. याबाबतची अधिसुचना उद्या जारी होणार आहे. मागिल आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुटखाबंदीच्या शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. यासंदर्भात अन्न औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात 1173 पानमसाला आणि गुटख्यांचे नमुने तपासले त्यापैकी 853 नमुन्यांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात आढळले त्यामुळे सार्वजनिक हितासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं सांगत मनोहर नाईक यांनी गुटखाबंदीची घोषणा केली. ही बंदी एक वर्षासाठी असेल. गुटखाबंदीचा कालावधीपूर्ण होण्याच्या आधीच पुन्हा गुटखा बंदीला मुदतवाढ देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा विधेयक 2006 अन्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारचा 100 कोटींचा महसूल बुडणार आहे. तसेच यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या सर्व पदार्थांवर कडक बंदी घालण्यात आली आहे. गुटखा सेवन करणे, विक्री करणे या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा आरोग्याला अतिशय हानिकारक पदार्थ आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गुटखा अथवा पानमसाला सारख्या पदार्थात जर मॅग्नेशियम कार्बोनेट आढळून आलेल्या पदार्थांवर सुध्दा बंदी लागू केली आहे. गुटखा बंदीच्या निर्णयात देशात महाराष्ट्र राज्य हे चौथे राज्य ठरले आहे.गुटखाबंदी- मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्यामुळे गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी- गुटख्याचं उत्पादन, वितरण, विक्री आणि साठा करणं गुन्हा असेल- बंदी मोडणार्‍यास 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद- सरकारचा 100 कोटी रुपयांचा महसूल बुडणार- गुटख्यावर बंदी घालणारं महाराष्ट्र चौथं राज्य- पान मसाल्यावर बंदी घालणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 09:32 AM IST

अखेर उद्यापासून गुटखाबंदी

19 जुलै

अखेर राज्यात उद्यापासून गुटखाबंदी लागू होणार आहे. गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ही बंदी गुटखा आणि पानमसाल्याचं उत्पादन, विक्री आणि साठा यावर घालण्यात आलीय. याबाबतची अधिसुचना उद्या जारी होणार आहे.

मागिल आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुटखाबंदीच्या शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. यासंदर्भात अन्न औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात 1173 पानमसाला आणि गुटख्यांचे नमुने तपासले त्यापैकी 853 नमुन्यांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात आढळले त्यामुळे सार्वजनिक हितासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं सांगत मनोहर नाईक यांनी गुटखाबंदीची घोषणा केली. ही बंदी एक वर्षासाठी असेल. गुटखाबंदीचा कालावधीपूर्ण होण्याच्या आधीच पुन्हा गुटखा बंदीला मुदतवाढ देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा विधेयक 2006 अन्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारचा 100 कोटींचा महसूल बुडणार आहे.

तसेच यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या सर्व पदार्थांवर कडक बंदी घालण्यात आली आहे. गुटखा सेवन करणे, विक्री करणे या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा आरोग्याला अतिशय हानिकारक पदार्थ आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गुटखा अथवा पानमसाला सारख्या पदार्थात जर मॅग्नेशियम कार्बोनेट आढळून आलेल्या पदार्थांवर सुध्दा बंदी लागू केली आहे. गुटखा बंदीच्या निर्णयात देशात महाराष्ट्र राज्य हे चौथे राज्य ठरले आहे.गुटखाबंदी- मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्यामुळे गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी- गुटख्याचं उत्पादन, वितरण, विक्री आणि साठा करणं गुन्हा असेल- बंदी मोडणार्‍यास 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद- सरकारचा 100 कोटी रुपयांचा महसूल बुडणार- गुटख्यावर बंदी घालणारं महाराष्ट्र चौथं राज्य- पान मसाल्यावर बंदी घालणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close