S M L

राज यांनी घेतली बाळासाहेबांची भेट

19 जुलैमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होणार आहे. त्यासाठीच चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. अँजिओप्लास्टीच्यावेळी राज स्वतः हजर राहणार आहेत. सोमवारी उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव यांची विचारपूस केली होती. आणि उद्धव यांना स्वतःच्या गाडीतून मातोश्रीवर घेऊन गेले होते. उद्या शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी होणार आहे. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत. अँजिओप्लास्टीच्या वेळी राज यांनी हजर राहावे अशी इच्छा बाळासाहेबांची आहे. सोेमवारी राज-उध्दव यांच्या भेटीमुळे राज ठाकरेंच्या या भूमिकेचं बाळासाहेबांनीसुद्धा कौतुक केलं आणि उद्धव यांच्या अँजिओप्लास्टीच्यावेळीही तिथं तू मला हवा आहेस, असा आपुलकीचा आदेश दिला...एकूणच.. या भेटीमुळे दोन्ही पक्ष जरी एकत्र येण्याची जरी शक्यता नसली तरी शिवसैनिकांमध्ये राज यांच्याबद्दल जो आदर वाढलाय त्याचे राजकीय परिणाम भविष्यात पडतील का.. हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 03:05 PM IST

राज यांनी घेतली बाळासाहेबांची भेट

19 जुलै

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होणार आहे. त्यासाठीच चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. अँजिओप्लास्टीच्यावेळी राज स्वतः हजर राहणार आहेत. सोमवारी उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव यांची विचारपूस केली होती. आणि उद्धव यांना स्वतःच्या गाडीतून मातोश्रीवर घेऊन गेले होते.

उद्या शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी होणार आहे. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत. अँजिओप्लास्टीच्या वेळी राज यांनी हजर राहावे अशी इच्छा बाळासाहेबांची आहे. सोेमवारी राज-उध्दव यांच्या भेटीमुळे राज ठाकरेंच्या या भूमिकेचं बाळासाहेबांनीसुद्धा कौतुक केलं आणि उद्धव यांच्या अँजिओप्लास्टीच्यावेळीही तिथं तू मला हवा आहेस, असा आपुलकीचा आदेश दिला...एकूणच.. या भेटीमुळे दोन्ही पक्ष जरी एकत्र येण्याची जरी शक्यता नसली तरी शिवसैनिकांमध्ये राज यांच्याबद्दल जो आदर वाढलाय त्याचे राजकीय परिणाम भविष्यात पडतील का.. हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close