S M L

राज ठाकरे होणार उध्दव यांचे पुन्हा सारथी

18 जुलैशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होणार आहे. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत. अँजिओप्लास्टीच्या वेळी राज ठाकरे हजर राहावे अशी इच्छा बाळासाहेबांची आहे. सोमवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं..आणि ही बातमी समजताच अलिबागची बैठक सोडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. इतकंच नाही तर उद्धवना डिस्चार्ज मिळताच राज स्वतः त्यांना मातोश्रीवर घेऊन गेले. या घटनेमुळे राजकीयदृष्ट्या दुरावलेल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एकीची स्वप्न पडू लागली आहे. एरव्ही आक्रमक असणारा शिवसैनिक.. उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं ऐकल्यानंतर भांबावून गेले. नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत शिवसेनेचं नेतृत्वातही काहीसं गोंधळलेलं होतं. अशा वेळी राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन सारी सूत्रं आपल्या हाती घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा करून झटपट निर्णय घेतले.राज ठाकरेंच्या या भूमिकेचं बाळासाहेबांनीसुद्धा कौतुक केलं आणि उद्धव यांच्या अँजिओप्लास्टीच्यावेळीही तिथं तू मला हवा आहेस, असा आपुलकीचा आदेश दिला...एकूणच.. या भेटीमुळे दोन्ही पक्ष जरी एकत्र येण्याची जरी शक्यता नसली तरी शिवसैनिकांमध्ये राज यांच्याबद्दल जो आदर वाढलाय त्याचे राजकीय परिणाम भविष्यात पडतील का.. हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2012 04:03 PM IST

राज ठाकरे होणार उध्दव यांचे पुन्हा सारथी

18 जुलै

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होणार आहे. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत. अँजिओप्लास्टीच्या वेळी राज ठाकरे हजर राहावे अशी इच्छा बाळासाहेबांची आहे.

सोमवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं..आणि ही बातमी समजताच अलिबागची बैठक सोडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. इतकंच नाही तर उद्धवना डिस्चार्ज मिळताच राज स्वतः त्यांना मातोश्रीवर घेऊन गेले. या घटनेमुळे राजकीयदृष्ट्या दुरावलेल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एकीची स्वप्न पडू लागली आहे. एरव्ही आक्रमक असणारा शिवसैनिक.. उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं ऐकल्यानंतर भांबावून गेले. नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत शिवसेनेचं नेतृत्वातही काहीसं गोंधळलेलं होतं. अशा वेळी राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन सारी सूत्रं आपल्या हाती घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा करून झटपट निर्णय घेतले.

राज ठाकरेंच्या या भूमिकेचं बाळासाहेबांनीसुद्धा कौतुक केलं आणि उद्धव यांच्या अँजिओप्लास्टीच्यावेळीही तिथं तू मला हवा आहेस, असा आपुलकीचा आदेश दिला...एकूणच.. या भेटीमुळे दोन्ही पक्ष जरी एकत्र येण्याची जरी शक्यता नसली तरी शिवसैनिकांमध्ये राज यांच्याबद्दल जो आदर वाढलाय त्याचे राजकीय परिणाम भविष्यात पडतील का.. हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2012 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close