S M L

'राज्यात राष्ट्रवादीला डावललं जातंय'

21 जुलैकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष चिघळला आहे. कालच्या दिल्लीतल्या नाट्यमय घडामोडींनंतर आज राज्यातल्या राष्ट्रवादी नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांपुढे आपलं गार्‍हाणं मांडलं. आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही, तसेच राष्ट्रवादीला डावललं जातंय, अशी तक्रार या नेत्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर दिल्लीत काँग्रेसच्या घडामोडींना वेग आलाय. दिल्लीतले काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आणि राज्यातल्या घडामोडींची माहिती घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आता आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावणार आहेत. आणि यावेळी दोन्ही पक्षांतल्या नेत्यांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या जाणार आहेत. समन्वय समितीची बैठकच होत नाही, अशी राष्ट्रवादीची तक्रार आहे. बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसला पत्र लिहिलं होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी म्हटलंय. पण गेल्या वर्षभरापासून असं पत्रच पाठवला नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादीनंसुद्धा शेवटचं पत्र हे सव्वा वर्षांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिल 2011 ला पाठवलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये संवादाच अभाव असल्याचं स्पष्ट होतंय .दरम्यान, समन्वय समितीत विषयाची चर्चा न करता राष्ट्रवादीनं वाद मीडियासमोर न्यायला नका होता, असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. समन्वय समितीची बैठक घेण्यासंदर्भात मधुर पिचड यांनी पत्र पाठवलं नसल्याचं माणिकरावांनी म्हटलंय. पण पिचड यांनी पाठवलेल्या पत्राची प्रत आयबीएन-लोकमतकडे आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय ते पाहूया...'विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 एप्रिल 2011 रोजी झालं. या अधिवेशनात राज्यातले महत्त्वाचे विषय उपस्थित करण्यात आले होते. यासंदर्भात आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असायला हवा, असं प्रकर्षानं जाणवत होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या सत्तेतल्या आणि संघटनेतल्या प्रमुखांनी एकत्र बसून अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. यासाठी समन्वय समितीची बैठक तातडीनं बोलवावी, यासाठी मुद्दाम हे पत्र लिहित आहे.'

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2012 09:36 AM IST

'राज्यात राष्ट्रवादीला डावललं जातंय'

21 जुलै

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष चिघळला आहे. कालच्या दिल्लीतल्या नाट्यमय घडामोडींनंतर आज राज्यातल्या राष्ट्रवादी नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांपुढे आपलं गार्‍हाणं मांडलं. आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही, तसेच राष्ट्रवादीला डावललं जातंय, अशी तक्रार या नेत्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर दिल्लीत काँग्रेसच्या घडामोडींना वेग आलाय.

दिल्लीतले काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आणि राज्यातल्या घडामोडींची माहिती घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आता आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावणार आहेत. आणि यावेळी दोन्ही पक्षांतल्या नेत्यांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या जाणार आहेत. समन्वय समितीची बैठकच होत नाही, अशी राष्ट्रवादीची तक्रार आहे.

बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसला पत्र लिहिलं होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी म्हटलंय. पण गेल्या वर्षभरापासून असं पत्रच पाठवला नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादीनंसुद्धा शेवटचं पत्र हे सव्वा वर्षांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिल 2011 ला पाठवलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये संवादाच अभाव असल्याचं स्पष्ट होतंय .दरम्यान, समन्वय समितीत विषयाची चर्चा न करता राष्ट्रवादीनं वाद मीडियासमोर न्यायला नका होता, असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.

समन्वय समितीची बैठक घेण्यासंदर्भात मधुर पिचड यांनी पत्र पाठवलं नसल्याचं माणिकरावांनी म्हटलंय. पण पिचड यांनी पाठवलेल्या पत्राची प्रत आयबीएन-लोकमतकडे आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय ते पाहूया...

'विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 एप्रिल 2011 रोजी झालं. या अधिवेशनात राज्यातले महत्त्वाचे विषय उपस्थित करण्यात आले होते. यासंदर्भात आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असायला हवा, असं प्रकर्षानं जाणवत होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या सत्तेतल्या आणि संघटनेतल्या प्रमुखांनी एकत्र बसून अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. यासाठी समन्वय समितीची बैठक तातडीनं बोलवावी, यासाठी मुद्दाम हे पत्र लिहित आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close