S M L

मुख्यमंत्र्यांवर मधुकर पिचड नाराज

21 जुलैदिल्ली सरकारवर शरद पवार यांच्या नाराजीनंतर राज्यात आघाडीवर त्याचे पडसाद उमटत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड नाराज आहे. पाच वेळ मागूनही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. पण मुख्यमंत्री शिवसेनेच्या नेत्यांना तासनतास भेटतात आणि आघाडीत निर्णय घेताना काँग्रेस राष्ट्रवादीला विश्वासात घेत नाही असा आरोप पिचड यांनी केला. सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचं आहे की काँग्रेस-शिवसेनेचं असा टोलाही पिचड यांनी लगावला. तसेच आघाडीच्या समन्वय समितीची बैठक घ्या, असं पत्र प्रदेश काँग्रेसला पाठवलं होतं पण मुख्यमंत्र्यांचे काही उत्तर आले नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याबाबतही त्यांना पत्र लिहले होते पण त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. तिकडे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसनं एक उमेदवार कमी दिला, त्याबाबत राष्ट्रवादीशी साधी चर्चा करण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला नाही असं पिचड म्हणले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2012 11:55 AM IST

मुख्यमंत्र्यांवर मधुकर पिचड नाराज

21 जुलै

दिल्ली सरकारवर शरद पवार यांच्या नाराजीनंतर राज्यात आघाडीवर त्याचे पडसाद उमटत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड नाराज आहे. पाच वेळ मागूनही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. पण मुख्यमंत्री शिवसेनेच्या नेत्यांना तासनतास भेटतात आणि आघाडीत निर्णय घेताना काँग्रेस राष्ट्रवादीला विश्वासात घेत नाही असा आरोप पिचड यांनी केला. सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचं आहे की काँग्रेस-शिवसेनेचं असा टोलाही पिचड यांनी लगावला.

तसेच आघाडीच्या समन्वय समितीची बैठक घ्या, असं पत्र प्रदेश काँग्रेसला पाठवलं होतं पण मुख्यमंत्र्यांचे काही उत्तर आले नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याबाबतही त्यांना पत्र लिहले होते पण त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. तिकडे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसनं एक उमेदवार कमी दिला, त्याबाबत राष्ट्रवादीशी साधी चर्चा करण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला नाही असं पिचड म्हणले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2012 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close