S M L

महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम करारात महाघोटाळा - सोमय्या

21 जुलैभाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्ला चढवला आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाच्या करारात महाघोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. के. एस. चमणकर यांना 30 लाख चौरस फूटांचा चटईक्षेत्र निर्देशांक एफएसआय (FSI) देण्यात आला. या एफएसआयवर केलेल्या बांधकामातून चमणकरला दोन हजार कोटीचा फायदा मिळणार आहे. आणि त्याबदल्यात सरकारचं हायमाऊंट गेस्ट हाऊस, आरटीओची इमारत आणि महाराष्ट्र सदन यांचं बांधकाम चमणकर करुन देणारे आहे. पण 300 कोटीच्या बांधकामाच्या बदल्यात कंत्राटदाराला तब्बल दोन हजार कोटीचा व्यवहार मिळवून दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2012 01:48 PM IST

महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम करारात महाघोटाळा - सोमय्या

21 जुलै

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्ला चढवला आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाच्या करारात महाघोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. के. एस. चमणकर यांना 30 लाख चौरस फूटांचा चटईक्षेत्र निर्देशांक एफएसआय (FSI) देण्यात आला. या एफएसआयवर केलेल्या बांधकामातून चमणकरला दोन हजार कोटीचा फायदा मिळणार आहे. आणि त्याबदल्यात सरकारचं हायमाऊंट गेस्ट हाऊस, आरटीओची इमारत आणि महाराष्ट्र सदन यांचं बांधकाम चमणकर करुन देणारे आहे. पण 300 कोटीच्या बांधकामाच्या बदल्यात कंत्राटदाराला तब्बल दोन हजार कोटीचा व्यवहार मिळवून दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2012 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close