S M L

प्रणव मुखर्जी नवे राष्ट्रपती

22 जुलैदेशाच्या 13 व्या राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जी विराजमान होणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांनी एनडीएचे उमेदवार पी. ए. संगमा यांचा दणदणीत पराभव केला आहे. प्रणवदांच्या विजयामुळे पश्चिम बंगालला पहिल्यांदाच राष्ट्रपतीपद मिळालंय. बीरभूम या बंगालमधल्या गावात आज दिवाळी साजरी होतेय. कारण इथे जन्मलेले प्रणव मुखर्जी आता भारताचे तेरावे राष्ट्रपती झाले आहेत. रविवारी झालेल्या मतमोजणीत प्रणवदांना 7 लाखांवर मतं मिळाली. तीन लाख मतं मिळवणार्‍या एनडीएच्या पी ए संगमांचा त्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयासाठी प्रणव मुखजीर्ंनी देशातल्या जनतेचे आभार मानले. येत्या 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहे. आज सकाळी 11 वाजता संसद भवनात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली. पहिल्या टप्प्याचा निकाल हाती आला तेव्हा प्रणवदांनी आघाडी घेतली होती ती शेवट पर्यंत कायम राखत एनडीएचे उमेदवार पी.ए. संगमा यांचा दणदणीत पराभव केलाय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतांचं मुल्य 10 लाख 98 हजार 882 आहेत. विजयासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज होती. 748 सदस्यांच्या मतांची मोजणी केल्यानंतर 15 जणांचे मत रद्द करण्यात आली. प्रणव मुखर्जी यांना 527 मतं मिळाली ज्याचे मुल्य 7,14,763 इतके होते. तरसंगमांना 3,15,987 मतं मिळाली. यानंतर दुसर्‍या टप्प्यात हरियाणामधून प्रणवदांना 53 मतं मिळाली तर संगमांना 29 मत , गुजरातमध्ये प्रणवदांना 59 मतं तर संगमांना 123 मतं, गोव्यात प्रणवदांना 9 आणि संगमांना 21 मतं, छत्तीसगढमध्ये प्रणवदांना 39 तर संगमांना 50 मतं मिळाली. तिकडे बिहारमध्ये प्रणवदांना 146 मत तर संगमांना 90 मत मिळाली. आणि आसाममध्ये संगमांना फक्त 13 मत मिळाली तिथे प्रणवदांना 110 मत मिळाली आहे. कर्नाटकमध्ये प्रणवदांना 117 मत मिळाली तिथे संगमांना 117 मतं मिळाली. महाराष्ट्रात प्रणवदांना 225 मत मिळाली तर संगमांना 47 मिळाली. तर मध्यप्रदेशमध्ये प्रणवदांना 73 तर संगमांना 156 मत मिळाली. केरळमध्ये प्रणवदांना 124 मत मिळाली. हिमाचल प्रदेशमध्ये प्रणवदांना 23 तर संगमांना 44 मत मिळाली आहे. प्रणवदांचा विजय निश्चितच होता म्हणून कार्यकर्त्यांनी सकाळपासून जल्लोष सुरु केला होता. आणि निकाल लागल्यानंतर बंगालसह दिल्लीत प्रणवदांच्या विजयाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापासून ते ममता बॅनर्जी आणि संगमांपर्यंत सर्वांनी प्रणवदांचं अभिनंदन केलं. प्रणवदांच्या मोठ्या विजयामुळे काँग्रेस पक्षातही आनंदाचं वातावरण आहे. प्रणवदांना शिवसेना आणि जेडीयू या दोन भाजपच्या मित्रपक्षांनी मतं दिली. प्रणवदांनी बाळासाहेबांचे आणि इतर सर्व नेत्यांचे फोन करून आभार मानले. पण जेडीयू आणि सपा या पक्षांनी आपल्या राज्यांसाठी पॅकेज मिळवून मतं दिली, असा आरोप पी ए संगमांनी केला. एक अनुभवी, सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमेचे आणि सर्वमान्य प्रणवदा आता देशाचे पहिले नागरिक म्हणून 25 जुलैला शपथ घेणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2012 10:58 AM IST

प्रणव मुखर्जी नवे राष्ट्रपती

22 जुलै

देशाच्या 13 व्या राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जी विराजमान होणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांनी एनडीएचे उमेदवार पी. ए. संगमा यांचा दणदणीत पराभव केला आहे. प्रणवदांच्या विजयामुळे पश्चिम बंगालला पहिल्यांदाच राष्ट्रपतीपद मिळालंय. बीरभूम या बंगालमधल्या गावात आज दिवाळी साजरी होतेय. कारण इथे जन्मलेले प्रणव मुखर्जी आता भारताचे तेरावे राष्ट्रपती झाले आहेत. रविवारी झालेल्या मतमोजणीत प्रणवदांना 7 लाखांवर मतं मिळाली. तीन लाख मतं मिळवणार्‍या एनडीएच्या पी ए संगमांचा त्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयासाठी प्रणव मुखजीर्ंनी देशातल्या जनतेचे आभार मानले. येत्या 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहे.

आज सकाळी 11 वाजता संसद भवनात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली. पहिल्या टप्प्याचा निकाल हाती आला तेव्हा प्रणवदांनी आघाडी घेतली होती ती शेवट पर्यंत कायम राखत एनडीएचे उमेदवार पी.ए. संगमा यांचा दणदणीत पराभव केलाय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतांचं मुल्य 10 लाख 98 हजार 882 आहेत. विजयासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज होती. 748 सदस्यांच्या मतांची मोजणी केल्यानंतर 15 जणांचे मत रद्द करण्यात आली. प्रणव मुखर्जी यांना 527 मतं मिळाली ज्याचे मुल्य 7,14,763 इतके होते. तरसंगमांना 3,15,987 मतं मिळाली.

यानंतर दुसर्‍या टप्प्यात हरियाणामधून प्रणवदांना 53 मतं मिळाली तर संगमांना 29 मत , गुजरातमध्ये प्रणवदांना 59 मतं तर संगमांना 123 मतं, गोव्यात प्रणवदांना 9 आणि संगमांना 21 मतं, छत्तीसगढमध्ये प्रणवदांना 39 तर संगमांना 50 मतं मिळाली. तिकडे बिहारमध्ये प्रणवदांना 146 मत तर संगमांना 90 मत मिळाली. आणि आसाममध्ये संगमांना फक्त 13 मत मिळाली तिथे प्रणवदांना 110 मत मिळाली आहे.

कर्नाटकमध्ये प्रणवदांना 117 मत मिळाली तिथे संगमांना 117 मतं मिळाली. महाराष्ट्रात प्रणवदांना 225 मत मिळाली तर संगमांना 47 मिळाली. तर मध्यप्रदेशमध्ये प्रणवदांना 73 तर संगमांना 156 मत मिळाली. केरळमध्ये प्रणवदांना 124 मत मिळाली. हिमाचल प्रदेशमध्ये प्रणवदांना 23 तर संगमांना 44 मत मिळाली आहे.

प्रणवदांचा विजय निश्चितच होता म्हणून कार्यकर्त्यांनी सकाळपासून जल्लोष सुरु केला होता. आणि निकाल लागल्यानंतर बंगालसह दिल्लीत प्रणवदांच्या विजयाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापासून ते ममता बॅनर्जी आणि संगमांपर्यंत सर्वांनी प्रणवदांचं अभिनंदन केलं. प्रणवदांच्या मोठ्या विजयामुळे काँग्रेस पक्षातही आनंदाचं वातावरण आहे.

प्रणवदांना शिवसेना आणि जेडीयू या दोन भाजपच्या मित्रपक्षांनी मतं दिली. प्रणवदांनी बाळासाहेबांचे आणि इतर सर्व नेत्यांचे फोन करून आभार मानले. पण जेडीयू आणि सपा या पक्षांनी आपल्या राज्यांसाठी पॅकेज मिळवून मतं दिली, असा आरोप पी ए संगमांनी केला. एक अनुभवी, सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमेचे आणि सर्वमान्य प्रणवदा आता देशाचे पहिले नागरिक म्हणून 25 जुलैला शपथ घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2012 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close