S M L

आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू

अरिजीत सेन, आसाम26 जुलैसलग पाचव्या दिवशीही आसाम अस्वस्थ आहे. या हिंसाचारात गेल्या पाच दिवसांत 44 लोकांचा बळी गेला आहे. तर 2 लाखांपोक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. स्थानिक बोडो आणि मुस्लीम समुदायात हा संघर्ष सुरू आहे. हिंसेचं लोण आता बोडोंची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोक्राझार, चिरांग, धुबरी आणि बोंगायगॉन या चारही जिल्ह्यात पसरलंय. दूरदूरवर पसरलेल्या गावांमध्ये हिंसाचार अजूनही सुरू असल्यामुळे.. आता राज्य सरकारने संरक्षणासाठी छावण्या तयार केल्यायत. मुख्यमंत्री तरूण गोगाई यांनी आज सरकारी पुनर्वसन छावण्यांमध्ये जाऊन पीडितांची भेट घेतली.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅगमार्च काढले. लष्कर, पोलीस, बीएसएफ आणि सीआरपीएफचे हजारो जवान चारही जिल्ह्यांमध्ये खडा पहारा देत आहेत. 100 छावण्यांमध्ये मुस्लिम आणि बोडो समुदायतल्या जवळपास 2 लाख लोकांनी आश्रय घेतलाय. पण पुरेशा सोयीसुविधांअभावी त्यांचे अतोनात हाल होताहेत. स्वत: पंतप्रधान मनमोहन सिंग 28 जुलैला आसामचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान आसाममधूनच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. स्थानिक प्रशासन दोन्ही समुदायांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात अजूनतरी यश आलेलं नाही. दरम्यान, मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी राजीनामा द्यायला नकार दिला असून.. काँग्रेसच्या हायकमांडनेही नेतृत्वबदल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. आसाममध्ये उसळलेल्या दंगलीची कारणं काय आहेत ?- 1990 पर्यंत कोक्राझार आणि चिरांग या दोन जिल्ह्यात बोडोंचं मोठ्या प्रमाणावर होते- पण गेल्या दोन दशकात इथे स्थलांतरित मुस्लिमांची संख्या झपाट्यानं वाढली- हे मुस्लिम बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे आल्याचा बोडोंचा आरोप- त्यामुळे गेल्या दशकभरात दोन्ही समुदायांमध्ये अनेक दंगली झाल्या

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2012 04:15 PM IST

आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू

अरिजीत सेन, आसाम26 जुलैसलग पाचव्या दिवशीही आसाम अस्वस्थ आहे. या हिंसाचारात गेल्या पाच दिवसांत 44 लोकांचा बळी गेला आहे. तर 2 लाखांपोक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. स्थानिक बोडो आणि मुस्लीम समुदायात हा संघर्ष सुरू आहे. हिंसेचं लोण आता बोडोंची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोक्राझार, चिरांग, धुबरी आणि बोंगायगॉन या चारही जिल्ह्यात पसरलंय. दूरदूरवर पसरलेल्या गावांमध्ये हिंसाचार अजूनही सुरू असल्यामुळे.. आता राज्य सरकारने संरक्षणासाठी छावण्या तयार केल्यायत. मुख्यमंत्री तरूण गोगाई यांनी आज सरकारी पुनर्वसन छावण्यांमध्ये जाऊन पीडितांची भेट घेतली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅगमार्च काढले. लष्कर, पोलीस, बीएसएफ आणि सीआरपीएफचे हजारो जवान चारही जिल्ह्यांमध्ये खडा पहारा देत आहेत. 100 छावण्यांमध्ये मुस्लिम आणि बोडो समुदायतल्या जवळपास 2 लाख लोकांनी आश्रय घेतलाय. पण पुरेशा सोयीसुविधांअभावी त्यांचे अतोनात हाल होताहेत.

स्वत: पंतप्रधान मनमोहन सिंग 28 जुलैला आसामचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान आसाममधूनच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. स्थानिक प्रशासन दोन्ही समुदायांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात अजूनतरी यश आलेलं नाही. दरम्यान, मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी राजीनामा द्यायला नकार दिला असून.. काँग्रेसच्या हायकमांडनेही नेतृत्वबदल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

आसाममध्ये उसळलेल्या दंगलीची कारणं काय आहेत ?

- 1990 पर्यंत कोक्राझार आणि चिरांग या दोन जिल्ह्यात बोडोंचं मोठ्या प्रमाणावर होते- पण गेल्या दोन दशकात इथे स्थलांतरित मुस्लिमांची संख्या झपाट्यानं वाढली- हे मुस्लिम बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे आल्याचा बोडोंचा आरोप- त्यामुळे गेल्या दशकभरात दोन्ही समुदायांमध्ये अनेक दंगली झाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2012 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close