S M L

आता शनिवारीही पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार मांडू शकता

28 जुलैआता दर शनिवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत नागरीक पोलीस अधिकार्‍यांना भेटून आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून आयुक्त परदेशी यांना संरक्षण पुरवण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झेड सेक्युरिटी असल्याचे पाटील यांनी सांगितले. गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगलीत बोलतांना ही घोषणा केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कुठलेही वाद नाहीत आणि समन्वय समिती द्वारे एकमेकांचा मान राखून कामकाज केले जाणार असल्याचेही आर आर पाटील म्हणाले. जे नेते जनमानसात लोकप्रिय असतात त्यांच्यावर टीका केल्यावर दिल्लीत आपल्या पक्षात वजन वाढते अशा काही नेत्यांच्या समजुती आहेत त्यामुळेच शरद पवार यांच्यावर टीका केली जाते असेही आर आर पाटील म्हणाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2012 01:43 PM IST

आता शनिवारीही पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार मांडू शकता

28 जुलै

आता दर शनिवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत नागरीक पोलीस अधिकार्‍यांना भेटून आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून आयुक्त परदेशी यांना संरक्षण पुरवण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झेड सेक्युरिटी असल्याचे पाटील यांनी सांगितले. गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगलीत बोलतांना ही घोषणा केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कुठलेही वाद नाहीत आणि समन्वय समिती द्वारे एकमेकांचा मान राखून कामकाज केले जाणार असल्याचेही आर आर पाटील म्हणाले. जे नेते जनमानसात लोकप्रिय असतात त्यांच्यावर टीका केल्यावर दिल्लीत आपल्या पक्षात वजन वाढते अशा काही नेत्यांच्या समजुती आहेत त्यामुळेच शरद पवार यांच्यावर टीका केली जाते असेही आर आर पाटील म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2012 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close