S M L

ग्रिड कोसळल्याने अर्धा देश काळोखात

31 जुलैउत्तर आणि पूर्व भारतात नॉर्दर्न आणि ईस्टर्न ग्रिड कोसळल्यानं राजधानी दिल्लीसह 11 राज्य अंधारात आहे. या राज्यातील रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प झाल्या आहेत. जवळपास 300 पेक्षा जास्त रेल्वे जागच्या जागी उभ्या राहिल्या आहे. राजधानी दिल्ली आणि कोलकात्यातली मेट्रो सेवा पूर्णपणे ठप्प झालीय. दिल्लीतल्या अत्यावश्यक सेवांसाठी भूतानमधून वीज घेण्यात येणार आहे. या वीज संकटाचा फटका हॉस्पिटल्सनाही बसलाय. अत्यावश्यक सेवा जनरेटवर सुरू करण्यात आल्यात. काही राज्यांनी जादा वीज खेचल्यानं हे संकट आल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलंय. अत्यावश्यक सेवा पूर्ववत करण्याला प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. एका तासात स्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, वेस्टर्न ग्रिडवर काहीच परिणाम झाला नसल्याने महाराष्ट्राला धोका नाही. या राज्यात वीज गायबजम्मू आणि काश्मीर, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा,उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल,ओडिशा, बिहार, सिक्कीम ग्रिड म्हणजे काय ?वीज निर्मिती केंद्र आणि लोड स्टेशन्स यांना जोडणारं नेटवर्क म्हणजे ग्रिडवीज वाहणार्‍या तारा आणि सबस्टेशन्सचं मिळून ग्रिड बनतंविजेची मागणी आणि पुरवठा समतोल असला, तर ग्रिड सुरळीत चालतंएका ग्रिडला अनेक राज्यं जोडलेली असतातनॉर्दन ग्रिड, ईस्टर्न ग्रिड आणि वेस्टर्न ग्रिड यांना जोडून नवीन ग्रिडची निर्मितीठरवलेल्या प्रमाणाबाहेर एखाद्या राज्यानं वीज खेचली की ग्रिडवर ताण येतोपुरवठ्याहून जास्त आणि बेसुमार वीज खेचली तर ग्रिड कोसळतंउत्तर प्रदेश प्रमाणाबाहेर वीज खेचण्यासाठी कुप्रसिद्ध आहेग्रिडवर ताण पाडल्याचा दंडही उत्तर प्रदेश नियमितपणे भरत नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2012 09:52 AM IST

ग्रिड कोसळल्याने अर्धा देश काळोखात

31 जुलै

उत्तर आणि पूर्व भारतात नॉर्दर्न आणि ईस्टर्न ग्रिड कोसळल्यानं राजधानी दिल्लीसह 11 राज्य अंधारात आहे. या राज्यातील रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प झाल्या आहेत. जवळपास 300 पेक्षा जास्त रेल्वे जागच्या जागी उभ्या राहिल्या आहे. राजधानी दिल्ली आणि कोलकात्यातली मेट्रो सेवा पूर्णपणे ठप्प झालीय. दिल्लीतल्या अत्यावश्यक सेवांसाठी भूतानमधून वीज घेण्यात येणार आहे. या वीज संकटाचा फटका हॉस्पिटल्सनाही बसलाय. अत्यावश्यक सेवा जनरेटवर सुरू करण्यात आल्यात. काही राज्यांनी जादा वीज खेचल्यानं हे संकट आल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलंय. अत्यावश्यक सेवा पूर्ववत करण्याला प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. एका तासात स्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, वेस्टर्न ग्रिडवर काहीच परिणाम झाला नसल्याने महाराष्ट्राला धोका नाही.

या राज्यात वीज गायबजम्मू आणि काश्मीर, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा,उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल,ओडिशा, बिहार, सिक्कीम

ग्रिड म्हणजे काय ?

वीज निर्मिती केंद्र आणि लोड स्टेशन्स यांना जोडणारं नेटवर्क म्हणजे ग्रिडवीज वाहणार्‍या तारा आणि सबस्टेशन्सचं मिळून ग्रिड बनतंविजेची मागणी आणि पुरवठा समतोल असला, तर ग्रिड सुरळीत चालतंएका ग्रिडला अनेक राज्यं जोडलेली असतातनॉर्दन ग्रिड, ईस्टर्न ग्रिड आणि वेस्टर्न ग्रिड यांना जोडून नवीन ग्रिडची निर्मितीठरवलेल्या प्रमाणाबाहेर एखाद्या राज्यानं वीज खेचली की ग्रिडवर ताण येतोपुरवठ्याहून जास्त आणि बेसुमार वीज खेचली तर ग्रिड कोसळतंउत्तर प्रदेश प्रमाणाबाहेर वीज खेचण्यासाठी कुप्रसिद्ध आहेग्रिडवर ताण पाडल्याचा दंडही उत्तर प्रदेश नियमितपणे भरत नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2012 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close