S M L

ऑलिम्पिकमध्ये भारताची 'गगन'भरारी

30 जुलैअखेर ज्या क्षणाची तमाम भारतीय वाट पाहत होते तो क्षण आला आहे भारताच्या मिशन ऑलिम्पिकला आता सुरुवात झाली आहे. नेमबाज गगन नारंगने ब्राँझ मेडल पटकावत भारताचे मेडलचे खाते उघडले आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये गगन नारंगनं ब्राँझ मेडलची कमाई केली आहे. गगननं 701.1 पॉईंटची कमाई केली. भारताचं हे आठवं वैयक्तिक मेडल ठरलंय. जागतिक पातळीवरील सर्व मेडल्स गगननं जिंकली होती.पण जग जिंकणार्‍या गगनला फक्त आणि फक्त ऑलिम्पिक मेडलनं हुलकावणी दिली होती. पण आज गगन ऑलिम्पिक मेडललाही गवसणी घातली.गगनच्या या यशाबद्दल देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले गगन नारंग याचे अभिनंदन केलंय. क्रीडा मंत्री अजय माकन यांनी त्याचे देशवासीयांच्यावतीनं आभारही मानलेत. गगनच्या गावी एकच जल्लोष सुरु आहे. मेडल कुठलेही असो पण ऑलिम्पिकमध्ये मिळाले याचा खूप आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया गगनच्या आई वडीलांनी दिली आहे. तर गगनच्या या कामगिरीमुळे हरियाणा सरकारने त्याला 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. गगन नारंगची आता पर्यंतची भरारी1) 2010 वर्ल्ड कप - 10 मीटर एअर रायफल - ब्राँझ मेडल2) 2010 वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीप - 10 मीटर एअर रायफल - ब्राँझ मेडल3) 2009 वर्ल्ड कप - 50 मीटर रायफल 3 पोझिशन - गोल्ड मेडल4) 2008 वर्ल्ड कप - 10 मीटर एअर रायफल- गोल्ड मेडल 5) 2010 एशियन गेम्स (गुआंग्झाओ)10 मीटर एअर रायफल - सिल्व्हर मेडल10 मीटर एअर रायफल टीम - सिल्व्हर मेडल6) कॉमनवेल्थ गेम्स 2010 - नवी दिल्ली50 मीटर रायफल 3 पोझिशन पेअर - गोल्ड मेडल50 मीटर रायफल 3 पोझिशन - गोल्ड मेडल7) 2010 - नवी दिल्ली10 मीटर एअर रायफल पेअर- गोल्ड मेडल10 मीटर एअर रायफल - गोल्ड मेडल8) 2006 - मेलबर्न50 मीटर रायफल 3 पोझिशन पेअर - गोल्ड मेडल50 मीटर रायफल 3 पोझिशन - गोल्ड मेडल9) 2006 - मेलबर्न10 मीटर एअर रायफल पेअर - गोल्ड मेडल10 मीटर एअर रायफल - गोल्ड मेडल

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2012 12:00 PM IST

ऑलिम्पिकमध्ये भारताची 'गगन'भरारी

30 जुलै

अखेर ज्या क्षणाची तमाम भारतीय वाट पाहत होते तो क्षण आला आहे भारताच्या मिशन ऑलिम्पिकला आता सुरुवात झाली आहे. नेमबाज गगन नारंगने ब्राँझ मेडल पटकावत भारताचे मेडलचे खाते उघडले आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये गगन नारंगनं ब्राँझ मेडलची कमाई केली आहे. गगननं 701.1 पॉईंटची कमाई केली. भारताचं हे आठवं वैयक्तिक मेडल ठरलंय. जागतिक पातळीवरील सर्व मेडल्स गगननं जिंकली होती.पण जग जिंकणार्‍या गगनला फक्त आणि फक्त ऑलिम्पिक मेडलनं हुलकावणी दिली होती. पण आज गगन ऑलिम्पिक मेडललाही गवसणी घातली.गगनच्या या यशाबद्दल देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले गगन नारंग याचे अभिनंदन केलंय. क्रीडा मंत्री अजय माकन यांनी त्याचे देशवासीयांच्यावतीनं आभारही मानलेत. गगनच्या गावी एकच जल्लोष सुरु आहे. मेडल कुठलेही असो पण ऑलिम्पिकमध्ये मिळाले याचा खूप आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया गगनच्या आई वडीलांनी दिली आहे. तर गगनच्या या कामगिरीमुळे हरियाणा सरकारने त्याला 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

गगन नारंगची आता पर्यंतची भरारी1) 2010 वर्ल्ड कप - 10 मीटर एअर रायफल - ब्राँझ मेडल2) 2010 वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीप - 10 मीटर एअर रायफल - ब्राँझ मेडल3) 2009 वर्ल्ड कप - 50 मीटर रायफल 3 पोझिशन - गोल्ड मेडल4) 2008 वर्ल्ड कप - 10 मीटर एअर रायफल- गोल्ड मेडल

5) 2010 एशियन गेम्स (गुआंग्झाओ)10 मीटर एअर रायफल - सिल्व्हर मेडल10 मीटर एअर रायफल टीम - सिल्व्हर मेडल

6) कॉमनवेल्थ गेम्स 2010 - नवी दिल्ली50 मीटर रायफल 3 पोझिशन पेअर - गोल्ड मेडल50 मीटर रायफल 3 पोझिशन - गोल्ड मेडल

7) 2010 - नवी दिल्ली10 मीटर एअर रायफल पेअर- गोल्ड मेडल10 मीटर एअर रायफल - गोल्ड मेडल

8) 2006 - मेलबर्न50 मीटर रायफल 3 पोझिशन पेअर - गोल्ड मेडल50 मीटर रायफल 3 पोझिशन - गोल्ड मेडल

9) 2006 - मेलबर्न10 मीटर एअर रायफल पेअर - गोल्ड मेडल10 मीटर एअर रायफल - गोल्ड मेडल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2012 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close