S M L

सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री

31 जुलैमहाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे सुशीलकुमार शिंदे आता देशाच्या गृहमंत्रीपदावर विराजमान झाले आहे. राष्ट्रपती भवनातून केंद्रीय खांदेपालट करणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिसुचना जारी करण्यात आली आहे. आता देशाच्या अर्थमंत्रीपदी पी.चिदंबरम विराजमान होणार आहे. चिदंबरम यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थखातं देण्यात आलं आहे. तर चिदंबरम यांच्याकडील गृहखातं सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे दिलं गेलं आहे. तर शिदेंचं ऊर्जा खाते विरप्पा मोईली यांच्याकडे अतिरिक्त भार दिला गेला आहे. विशेष म्हणजे शिंदेंना लोकसभेचं नेतेपदही दिलं गेलं आहे. सुशीलकुमार शिंदेंनी न्यायालयातील एका शिपाई पासून सुरु केला प्रवास आज दिल्ली दरबारी दाखल झालाय. सुशीलकुमार शिंदेंनी राज्याचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. येणार्‍या अधिवेशनाच्या पुर्वतयारी लक्षात घेता काँग्रेसने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र दुसरीकडे देशातील 12 राज्य अंधारात असताना केंद्र सरकारचा निर्णयावर आश्चर्य व्यक्त केला जात आहे. निम्मा देश अंधारात असताना केंद्रीय ऊर्जामंत्री बदलले आहे. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. मंगळवारी जवळपास अर्धा भारत वीज खंडीत झाल्यानं अंधारात बुडाला होता. पण यूपीएमध्ये वेगळाच पॉवर गेम सुरू होता. 24 तासात दोन वेळा पॉवर ग्रीड का कोसळलं याचं उत्तर ज्यांनी देणं गरजेचं होतं त्यांना गृहखात्याची जबाबदारी देण्यात आली. इतकंच नाही तर सुशिल कुमार शिंदे यांना लवकरच लोकसभेचं नेतेपदही देण्यात येणार आहे. इतक्या महत्त्वाच्या दिवशीच शिंदेंना गृहमंत्री आणि पी. चिदंबरम यांना अर्थमंत्री करण्यात आलं. त्यामुळे विरोधकांनाही आयतीच संधी मिळाली. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटवरून केंद्र सरकारवर टीका केली, पंतप्रधान साहेब, 60 कोटी जनता आणि 19 राज्य अंधारात आहेत. यावेळी तुम्ही कोणता आघाडीचा धर्म पाळत आहात, हे देशाला जाणून घ्यायचं आहे.सुमार कामगिरीमुळे विरप्पा मोईली यांचं कायदा मंत्रालय काढून त्यांना कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनाच आता ऊर्जा खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलीय. त्यांनाही बत्ती गुल झाल्यानं होणार्‍या त्रासाचा अनुभव आला. पी. चिदंबरम यांनाही तसाच अनुभव आला. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत अचानक बत्ती गुल झाली. पी. चिदंबरम यांच्यावर 2 जी घोटाळ्याचे तर सुशिल कुमार शिंदे यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप आहेत. पण तरीही त्यांची बढती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. सुशिलकुमार शिंदेंचा प्रवास शिपाई ते गृहमंत्री1941 : सोलापुरात जन्मकायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर पोलीस सेवेत नोकरी1971 : शरद पवारांच्या प्रेरणेने राजकारणात आणि काँग्रेसमध्ये प्रवेश1974 : पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेलेपुढे त्यांनी अर्थ, उद्योग, नगर विकास अशा महत्त्वाच्या खाती सांभाळली1990 : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष 1992 : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस1992 : राज्यसभेची खासदारकी1998 : लोकसभेवर निवडून गेले1999 : सोनिया गांधींचा अमेठीमधला प्रचार सांभाळला2002 : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव2003 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री2004 : आंध्र प्रदेशचे राज्यपाल2006 : केंद्रीय ऊर्जामंत्री2012 : केंद्रीय गृहमंत्री

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2012 01:06 PM IST

सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री

31 जुलै

महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे सुशीलकुमार शिंदे आता देशाच्या गृहमंत्रीपदावर विराजमान झाले आहे. राष्ट्रपती भवनातून केंद्रीय खांदेपालट करणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिसुचना जारी करण्यात आली आहे. आता देशाच्या अर्थमंत्रीपदी पी.चिदंबरम विराजमान होणार आहे. चिदंबरम यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थखातं देण्यात आलं आहे. तर चिदंबरम यांच्याकडील गृहखातं सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे दिलं गेलं आहे. तर शिदेंचं ऊर्जा खाते विरप्पा मोईली यांच्याकडे अतिरिक्त भार दिला गेला आहे. विशेष म्हणजे शिंदेंना लोकसभेचं नेतेपदही दिलं गेलं आहे. सुशीलकुमार शिंदेंनी न्यायालयातील एका शिपाई पासून सुरु केला प्रवास आज दिल्ली दरबारी दाखल झालाय. सुशीलकुमार शिंदेंनी राज्याचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. येणार्‍या अधिवेशनाच्या पुर्वतयारी लक्षात घेता काँग्रेसने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र दुसरीकडे देशातील 12 राज्य अंधारात असताना केंद्र सरकारचा निर्णयावर आश्चर्य व्यक्त केला जात आहे. निम्मा देश अंधारात असताना केंद्रीय ऊर्जामंत्री बदलले आहे. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

मंगळवारी जवळपास अर्धा भारत वीज खंडीत झाल्यानं अंधारात बुडाला होता. पण यूपीएमध्ये वेगळाच पॉवर गेम सुरू होता. 24 तासात दोन वेळा पॉवर ग्रीड का कोसळलं याचं उत्तर ज्यांनी देणं गरजेचं होतं त्यांना गृहखात्याची जबाबदारी देण्यात आली. इतकंच नाही तर सुशिल कुमार शिंदे यांना लवकरच लोकसभेचं नेतेपदही देण्यात येणार आहे. इतक्या महत्त्वाच्या दिवशीच शिंदेंना गृहमंत्री आणि पी. चिदंबरम यांना अर्थमंत्री करण्यात आलं. त्यामुळे विरोधकांनाही आयतीच संधी मिळाली. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटवरून केंद्र सरकारवर टीका केली, पंतप्रधान साहेब, 60 कोटी जनता आणि 19 राज्य अंधारात आहेत. यावेळी तुम्ही कोणता आघाडीचा धर्म पाळत आहात, हे देशाला जाणून घ्यायचं आहे.

सुमार कामगिरीमुळे विरप्पा मोईली यांचं कायदा मंत्रालय काढून त्यांना कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनाच आता ऊर्जा खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलीय. त्यांनाही बत्ती गुल झाल्यानं होणार्‍या त्रासाचा अनुभव आला. पी. चिदंबरम यांनाही तसाच अनुभव आला. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत अचानक बत्ती गुल झाली.

पी. चिदंबरम यांच्यावर 2 जी घोटाळ्याचे तर सुशिल कुमार शिंदे यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप आहेत. पण तरीही त्यांची बढती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. सुशिलकुमार शिंदेंचा प्रवास शिपाई ते गृहमंत्री1941 : सोलापुरात जन्मकायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर पोलीस सेवेत नोकरी1971 : शरद पवारांच्या प्रेरणेने राजकारणात आणि काँग्रेसमध्ये प्रवेश1974 : पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेलेपुढे त्यांनी अर्थ, उद्योग, नगर विकास अशा महत्त्वाच्या खाती सांभाळली1990 : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष 1992 : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस1992 : राज्यसभेची खासदारकी1998 : लोकसभेवर निवडून गेले1999 : सोनिया गांधींचा अमेठीमधला प्रचार सांभाळला2002 : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव2003 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री2004 : आंध्र प्रदेशचे राज्यपाल2006 : केंद्रीय ऊर्जामंत्री2012 : केंद्रीय गृहमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2012 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close