S M L

अखेरचा निरोप कामटे, साळसकरांना ...

27 नोव्हेंबर मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात केवळ मुंबईच नव्हे तर सारा देश हादरला. याच हल्ल्यात मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला. मुंबई पोलिसातील तीन वीर एका पाठोपाठ एक असे एका तासात शहीद झाले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय साळसकर आणि डीसीपी अशोक कामटे यांच्यावर दुपारी अंत्य संस्कार करण्यात आहे.वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय साळसकरांना मेट्रो सिनेमाजवळ दहशतवाद्यांशी सामना करताना त्यांना गोळ्या लागल्या. साळसकर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमध्ये खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम करत होते. दुपारी मुंबईमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसंच डीसीपी अशोक कामटेही याच चकमकीत शहीद झाले. ते राज्याच्या पोलीस दलातले एक प्रमुख अधिकारी होते. सोलापूरचे आयुक्त म्हणून त्यांनी याआधी काम पाहिलं होतं. दक्ष आणि तत्पर अधिकारी म्हणून ते पोलीस दलात ओळखले जात.पुण्यात त्यांच्यावर शासकीय इतमाने अंत्यसंस्कार करण्यात आले.दोघांच्याही अंत्ययात्रेला नागरिकांची मोठयाप्रमाणात उपस्थिती होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2008 12:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2008 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close