S M L

अखेर गुलाबराव देवकरांचा राजीनामा

07 ऑगस्टघरकुल घोटाळ्याप्रकरणी अखेर परिवहन राज्यमंत्री गुबालराव देवकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला. अजित पवार देवकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी ही घोषणा केलीय. पण दुसरीकडे देवकर यांना सुप्रीम कोर्टाकडून मात्र सध्यातरी दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याबाबतची पुढची सुनावणी 21 ऑगस्टला होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.जळगाव घरकुल घोटाळा- झोपडपट्टीवासियांसाठी मोफत घरं बांधण्याचा जळगाव नगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प- प्रकल्प मंजूर करण्यामध्ये गुलाबराव देवकरांची महत्त्वाची भूमिका- योजना मंजूर झाली तेव्हा देवकर नगराध्यक्ष आणि उच्चाधिकार समितीचे सदस्य - खान्देश बिल्डरला नियम डावलून प्रकल्पाचा ठेका दिल्याचा ठपका- एका रात्रीतून निविदा प्रक्रियेचे नियम बदलण्यात आले- ठेकेदाराला प्रारंभिक रक्कम देवकर यांच्या सहीनं दिली गेली- प्रकल्पाची मूळ किंमत 89 कोटी होती- हुडकोकडून 103 कोटींचं कर्ज घेतलं गेलं- 29 कोटींचा अपहार केल्याचा ठपका

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2012 11:46 AM IST

अखेर गुलाबराव देवकरांचा राजीनामा

07 ऑगस्ट

घरकुल घोटाळ्याप्रकरणी अखेर परिवहन राज्यमंत्री गुबालराव देवकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला. अजित पवार देवकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी ही घोषणा केलीय. पण दुसरीकडे देवकर यांना सुप्रीम कोर्टाकडून मात्र सध्यातरी दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याबाबतची पुढची सुनावणी 21 ऑगस्टला होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

जळगाव घरकुल घोटाळा

- झोपडपट्टीवासियांसाठी मोफत घरं बांधण्याचा जळगाव नगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प- प्रकल्प मंजूर करण्यामध्ये गुलाबराव देवकरांची महत्त्वाची भूमिका- योजना मंजूर झाली तेव्हा देवकर नगराध्यक्ष आणि उच्चाधिकार समितीचे सदस्य - खान्देश बिल्डरला नियम डावलून प्रकल्पाचा ठेका दिल्याचा ठपका- एका रात्रीतून निविदा प्रक्रियेचे नियम बदलण्यात आले- ठेकेदाराला प्रारंभिक रक्कम देवकर यांच्या सहीनं दिली गेली- प्रकल्पाची मूळ किंमत 89 कोटी होती- हुडकोकडून 103 कोटींचं कर्ज घेतलं गेलं- 29 कोटींचा अपहार केल्याचा ठपका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2012 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close