S M L

विलासरावांना लिव्हर कॅन्सर, प्रकृती चिंताजनक

08 ऑगस्टकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्यावर चेन्नई येथील सुप्रसिध्द डॉ. रेगे यांच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहे. आज ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर, पण शुद्धीवर आहेत. पण औषधांना ते काहीसा प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. मात्र प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत यकृत प्रत्यारोपण होणार नाही असा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. त्यांना यकृताचा कॅन्सर असल्याचं थर्ड स्टेजमध्ये लक्षात आला आहे. त्याचा गंभीर परिणाम दोन्ही किडन्यांवर झाला आहे. शरीरात पसरत्या इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दरम्यान, आज विलासराव देशमुख यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यातील सात ते आठ ज्येष्ठ मंत्री चेन्नईला रवाना झाले आहेत. लातूरकरांची देवाकडे प्रार्थनातर दुसरीकडे विलासराव देशमुख यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी लातूरकर प्रार्थना करत आहे. सर्वधर्मीय लोक लातूरमध्ये त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. शहरात आज एका प्रार्थनासभेचं आयोजन करण्यात आलंय. यात सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येत देवाला साकडं घातलं. सामुहिक प्रार्थनाविलासराव देशमुख यांच्यासाठी लातूर जिल्ह्यातील अनेक शाळांमधे विद्यार्थ्यांनी प्रार्थना सुरु केल्या आहेत. देवणी हा लहानश्या गावातील आबासाहेब इंग्रजी प्राथमिक शाळेतील मुलांनी विलासराव लवकर बरे व्हावे यासाठी सामुहिक प्रार्थना केली.खंडोबा चरणी प्रार्थनाविलासराव देशमुख यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी त्यांना स्वास्थ्य लाभावं यासाठी पुरंदर तालुक्यातल्या जेजुरी इथलं महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाला साकडं घालण्यात आलं. जेजुरीतल्या ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी अभिषेक आणि पूजा करत सदानंद येळकोटच्या गजरात महाराष्ट्रासाठी विलासराव देशमुख यांना आरोग्यदायी स्वास्थ्य लाभावे अशी खंडोबा चरणी प्रार्थना केली.अ ाज विलासराव देशमुखांच्या कुटुंबियांनी शिर्डीमध्येही अन्नदान केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2012 03:59 PM IST

विलासरावांना लिव्हर कॅन्सर, प्रकृती चिंताजनक

08 ऑगस्ट

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्यावर चेन्नई येथील सुप्रसिध्द डॉ. रेगे यांच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहे. आज ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर, पण शुद्धीवर आहेत. पण औषधांना ते काहीसा प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. मात्र प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत यकृत प्रत्यारोपण होणार नाही असा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. त्यांना यकृताचा कॅन्सर असल्याचं थर्ड स्टेजमध्ये लक्षात आला आहे. त्याचा गंभीर परिणाम दोन्ही किडन्यांवर झाला आहे. शरीरात पसरत्या इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दरम्यान, आज विलासराव देशमुख यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यातील सात ते आठ ज्येष्ठ मंत्री चेन्नईला रवाना झाले आहेत.

लातूरकरांची देवाकडे प्रार्थना

तर दुसरीकडे विलासराव देशमुख यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी लातूरकर प्रार्थना करत आहे. सर्वधर्मीय लोक लातूरमध्ये त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. शहरात आज एका प्रार्थनासभेचं आयोजन करण्यात आलंय. यात सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येत देवाला साकडं घातलं.

सामुहिक प्रार्थना

विलासराव देशमुख यांच्यासाठी लातूर जिल्ह्यातील अनेक शाळांमधे विद्यार्थ्यांनी प्रार्थना सुरु केल्या आहेत. देवणी हा लहानश्या गावातील आबासाहेब इंग्रजी प्राथमिक शाळेतील मुलांनी विलासराव लवकर बरे व्हावे यासाठी सामुहिक प्रार्थना केली.

खंडोबा चरणी प्रार्थना

विलासराव देशमुख यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी त्यांना स्वास्थ्य लाभावं यासाठी पुरंदर तालुक्यातल्या जेजुरी इथलं महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाला साकडं घालण्यात आलं. जेजुरीतल्या ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी अभिषेक आणि पूजा करत सदानंद येळकोटच्या गजरात महाराष्ट्रासाठी विलासराव देशमुख यांना आरोग्यदायी स्वास्थ्य लाभावे अशी खंडोबा चरणी प्रार्थना केली.अ ाज विलासराव देशमुखांच्या कुटुंबियांनी शिर्डीमध्येही अन्नदान केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2012 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close