S M L

'फुलराणी' सायनाचं जंगी स्वागत

07 ऑगस्टलंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलची कमाई करणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मायदेशी परतली आहे. हैदराबादमध्ये आज सायनाचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी तिचे कोच पुलेला गोपीचंदही सायनाबरोबर होते. हैदराबादमध्ये विमानतळापासून सायनाची एका बसमधून जंगी मिरवणूक काढली गेली. पण या मिरवणुकीत बस खराब झाल्यानं व्यत्यय आला. पण मिरवणुकीचा उत्साह तसाच कायम राहीला. सायनाबरोबरचं ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारणारा परुपल्ली कश्यप, आणि दमदार कामगिरी करणार्‍या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पा यांचंही जंगी स्वागत केलं गेलं. ऑलिम्पिक क्वार्टरफायनल गाठणारा कश्यप हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2012 12:37 PM IST

'फुलराणी' सायनाचं जंगी स्वागत

07 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलची कमाई करणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मायदेशी परतली आहे. हैदराबादमध्ये आज सायनाचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी तिचे कोच पुलेला गोपीचंदही सायनाबरोबर होते. हैदराबादमध्ये विमानतळापासून सायनाची एका बसमधून जंगी मिरवणूक काढली गेली. पण या मिरवणुकीत बस खराब झाल्यानं व्यत्यय आला. पण मिरवणुकीचा उत्साह तसाच कायम राहीला. सायनाबरोबरचं ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारणारा परुपल्ली कश्यप, आणि दमदार कामगिरी करणार्‍या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पा यांचंही जंगी स्वागत केलं गेलं. ऑलिम्पिक क्वार्टरफायनल गाठणारा कश्यप हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2012 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close