S M L

मेरी कोमचा 'गोल्डन पंच' हुकला, ब्राँझ मेडल हाती

08 ऑगस्टसंपूर्ण भारतीयांचे ज्या 'गोल्डन' पंचकडे लक्ष लागले होते तो हुकला आहे. भारताची सुपरमॉम बॉक्सर मेरी कोमचा आजच्या निर्णायक मॅचमध्ये धक्कादायक पराभव झाला आहे. सेमीफायनलमध्ये आज इंग्लंडच्या 51 किलो गटात सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या निकोला ऍडमनं मेरी कॉमचा 11-6 असा पराभव केला. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार्‍या निकोलानं सुरुवातीपासूनच मॅचवर वर्चस्व गाजवलं. पहिला सेट 1-3 असा जिंकत निकोलानं आघाडी घेतली आणि चौथ्या राऊंडपर्यत ती टीकवलीही. मेरी कोमचं आक्रमण मात्र आज कमी पडलं. मात्र सेमीफायनल गाठत तिने या अगोदरच एक पदक राखीव केले होते. त्यामुळे मेरीला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागणार आहे. मी देशवासीयांची माफी मागते, मी गोल्ड मेडल जिंकू शकले नाहीत, अशी प्रतिक्रया मॅच संपल्यानंतर मेरी कॉमनं दिली. मात्र मेरी कोमचा पराभव जरी झाला असेल पण भारतीय महिला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ मेडल पटकावून देणारी ती पहिली महिला ठरली आहे. मेरीच्या आजच्या पराभवामुळे भारतीय प्रेक्षक नाराज झाले असतील तरी ब्राँझ मेडल हाती असल्यामुळे समाधानी आहे.इकडे मेरी कोमच्या मणिपूर इथल्या घरी सेमीफायनल मॅच पहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. मेरी कोमला सेमीफायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला असला तरी तिच्या दमदार कामगिरीबद्दल कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. मेरी कॉम मायदेशी परतल्यावर तिच्या जंगी स्वागताची तयारीही त्यांनी केली आहे. मेरीच्या ब्राँझ मेडलबरोबर भारताच्या खात्यात आता दोन ब्राँझ आणि एक सिल्व्हर मिळून एकूण चार मेडल जमा झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2012 01:29 PM IST

मेरी कोमचा 'गोल्डन पंच' हुकला, ब्राँझ मेडल हाती

08 ऑगस्ट

संपूर्ण भारतीयांचे ज्या 'गोल्डन' पंचकडे लक्ष लागले होते तो हुकला आहे. भारताची सुपरमॉम बॉक्सर मेरी कोमचा आजच्या निर्णायक मॅचमध्ये धक्कादायक पराभव झाला आहे. सेमीफायनलमध्ये आज इंग्लंडच्या 51 किलो गटात सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या निकोला ऍडमनं मेरी कॉमचा 11-6 असा पराभव केला.

घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार्‍या निकोलानं सुरुवातीपासूनच मॅचवर वर्चस्व गाजवलं. पहिला सेट 1-3 असा जिंकत निकोलानं आघाडी घेतली आणि चौथ्या राऊंडपर्यत ती टीकवलीही. मेरी कोमचं आक्रमण मात्र आज कमी पडलं. मात्र सेमीफायनल गाठत तिने या अगोदरच एक पदक राखीव केले होते. त्यामुळे मेरीला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागणार आहे. मी देशवासीयांची माफी मागते, मी गोल्ड मेडल जिंकू शकले नाहीत, अशी प्रतिक्रया मॅच संपल्यानंतर मेरी कॉमनं दिली. मात्र मेरी कोमचा पराभव जरी झाला असेल पण भारतीय महिला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ मेडल पटकावून देणारी ती पहिली महिला ठरली आहे. मेरीच्या आजच्या पराभवामुळे भारतीय प्रेक्षक नाराज झाले असतील तरी ब्राँझ मेडल हाती असल्यामुळे समाधानी आहे.

इकडे मेरी कोमच्या मणिपूर इथल्या घरी सेमीफायनल मॅच पहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. मेरी कोमला सेमीफायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला असला तरी तिच्या दमदार कामगिरीबद्दल कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. मेरी कॉम मायदेशी परतल्यावर तिच्या जंगी स्वागताची तयारीही त्यांनी केली आहे. मेरीच्या ब्राँझ मेडलबरोबर भारताच्या खात्यात आता दोन ब्राँझ आणि एक सिल्व्हर मिळून एकूण चार मेडल जमा झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2012 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close