S M L

शाहरुखचा वानखेडेवर राडा प्रकरण मुंबई पोलिसांना नोटीस

09 ऑगस्टआयपीएल 5 च्या हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियमध्ये कोलकाता नाईट रायडरचा मालक आणि बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याने दिलेल्या शिवीगाळ प्रकरणात वेगळ वळण घेतलंय. बालहक्क आयोगाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. शाहरुख जेव्हा स्टेडियमध्ये सुरुक्षा रक्षकांना शिवीगाळ करत होता, तेव्हा तिथे अनेक अल्पवयीन मुलं उपस्थित होते. ताडदेवमध्ये राहणार्‍या अजय मारु यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांत रीतसर तक्रारही केली होती. मात्र तक्रारीची दखल न घेतल्यानं अखेर मारु यांनी बालहक्क आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने या संदर्भात 16 ऑगस्टला सुनावणीकरीता मुंबई पोलिसांना वकीलासोबत सुनावणीकरीता हजर राहण्यास बजावलंय. कोलकाताच्या टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. टीमला पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखची मुलं वानखेडे मैदानावर गेली होती. यावेळी सुरक्षारक्षकांनी मुलांना हटकलं. हे पाहुन संतापलेल्या शाहरुख खानने सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. प्रकरण एवढे चिघळले की, शाहरुख शिवीगाळ करण्यावर उतरला. सुरक्षारक्षकांनीही धक्काबुक्की केल्याचा आरोप शाहरुखने केला. या प्रकरणी शाहरुखवर एमसीएने पाच वर्षांची वानखेडे स्टेडियमवर बंदी घातलीय. पण झालेल्या प्रकरणावर शाहरुखने सुरुवातीला माफी मागण्यास नकार दिला होता. पण आयपीएल फायनल जिंकल्यानंतर माझ्यामुळे माझ्या फॅनची मनं दुखावली असतील तरी मी माफी मागतो अशा शब्दात शाहरुखने जाहीर माफी मागितली होती. एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनीही शाहरुखला वानखेडेवरील बंदी उठवण्याचे संकेत दिले होते. मात्र हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा एसआरके वादात सापडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 11:17 AM IST

शाहरुखचा वानखेडेवर राडा प्रकरण मुंबई पोलिसांना नोटीस

09 ऑगस्ट

आयपीएल 5 च्या हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियमध्ये कोलकाता नाईट रायडरचा मालक आणि बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याने दिलेल्या शिवीगाळ प्रकरणात वेगळ वळण घेतलंय. बालहक्क आयोगाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. शाहरुख जेव्हा स्टेडियमध्ये सुरुक्षा रक्षकांना शिवीगाळ करत होता, तेव्हा तिथे अनेक अल्पवयीन मुलं उपस्थित होते. ताडदेवमध्ये राहणार्‍या अजय मारु यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांत रीतसर तक्रारही केली होती. मात्र तक्रारीची दखल न घेतल्यानं अखेर मारु यांनी बालहक्क आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने या संदर्भात 16 ऑगस्टला सुनावणीकरीता मुंबई पोलिसांना वकीलासोबत सुनावणीकरीता हजर राहण्यास बजावलंय.

कोलकाताच्या टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. टीमला पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखची मुलं वानखेडे मैदानावर गेली होती. यावेळी सुरक्षारक्षकांनी मुलांना हटकलं. हे पाहुन संतापलेल्या शाहरुख खानने सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. प्रकरण एवढे चिघळले की, शाहरुख शिवीगाळ करण्यावर उतरला. सुरक्षारक्षकांनीही धक्काबुक्की केल्याचा आरोप शाहरुखने केला. या प्रकरणी शाहरुखवर एमसीएने पाच वर्षांची वानखेडे स्टेडियमवर बंदी घातलीय. पण झालेल्या प्रकरणावर शाहरुखने सुरुवातीला माफी मागण्यास नकार दिला होता. पण आयपीएल फायनल जिंकल्यानंतर माझ्यामुळे माझ्या फॅनची मनं दुखावली असतील तरी मी माफी मागतो अशा शब्दात शाहरुखने जाहीर माफी मागितली होती. एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनीही शाहरुखला वानखेडेवरील बंदी उठवण्याचे संकेत दिले होते. मात्र हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा एसआरके वादात सापडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close