S M L

मावळ गोळीबारात मृतांच्या वारसांना नोकर्‍या अजून कागदावरच

09 ऑगस्टमावळ गोळीबार प्रकरणी तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र बळी गेलेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना पिंपरी चिंचवड पालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन अजून फायलीतच अडकलेलं आहे. ज्या जलवाहिनीला शेतकर्‍यांनी विरोध केला होता आता ती पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे पालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सांगितलं आहे. 9 ऑगस्ट 2011 रोजी पवना धरणातून भुमिगत जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आंदोलन केले होते. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता. शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे राज्यभरातून लोकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. विरोधकांनीही विधानसभेत प्रकरण उचलून धरत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले होते. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचे जाहीर केले होते. मात्र वर्ष उलटले ही घोषणाही हवेत विरळून गेली आहे. आज वर्षभरानंतर शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना नोकरी देण्यासंदर्भात नियमात बदल करावे लागतील यासदंर्भात स्मरण पत्र शासनाला पाठवण्यात आलं आहे असं आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सांगितलं आहे. यामुळे पुढील काही महिने तरी मावळ गोळीबारात बळी गेलेल्यांच्या वारसांना नोकरी मिळण्याची शक्यता दिसत नाही. दरम्यान, शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांनी महापालिका आयुक्तांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. या प्रश्नावर शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2012 12:11 PM IST

मावळ गोळीबारात मृतांच्या वारसांना नोकर्‍या अजून कागदावरच

09 ऑगस्ट

मावळ गोळीबार प्रकरणी तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र बळी गेलेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना पिंपरी चिंचवड पालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन अजून फायलीतच अडकलेलं आहे. ज्या जलवाहिनीला शेतकर्‍यांनी विरोध केला होता आता ती पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे पालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सांगितलं आहे.

9 ऑगस्ट 2011 रोजी पवना धरणातून भुमिगत जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आंदोलन केले होते. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता. शेतकर्‍यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे राज्यभरातून लोकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. विरोधकांनीही विधानसभेत प्रकरण उचलून धरत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले होते. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचे जाहीर केले होते. मात्र वर्ष उलटले ही घोषणाही हवेत विरळून गेली आहे. आज वर्षभरानंतर शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना नोकरी देण्यासंदर्भात नियमात बदल करावे लागतील यासदंर्भात स्मरण पत्र शासनाला पाठवण्यात आलं आहे असं आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सांगितलं आहे. यामुळे पुढील काही महिने तरी मावळ गोळीबारात बळी गेलेल्यांच्या वारसांना नोकरी मिळण्याची शक्यता दिसत नाही. दरम्यान, शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांनी महापालिका आयुक्तांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. या प्रश्नावर शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2012 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close